लोकमत न्यूज नेटवर्क, पाली: येथील श्री बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे प्रसाद म्हणून लाडू दिला जात होता. आता भाविकांना लाडू ऐवजी चिक्की दिली जाणार आहे. बुधवारी संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चिक्कीचा प्रसाद श्री बल्लाळेश्वराला अर्पण करून या नवीन योजनेचा शुभारंभ करण्यात आला.
बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गद्रे यांच्या हस्ते चिक्कीचा प्रसाद ठेवण्यात आला. यावेळी देवस्थान ट्रस्टचे उपसरपंच, सर्व विश्वस्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिक्कीची किंमत ३० रुपये असणार
चिक्कीची किमत ३० रुपये असणार आहे. याबद्दल बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष जितेंद्र गदे यांनी सांगितले की, बल्लाळेश्वर देवस्थानतर्फे आम्ही विविध उपक्रम राबवीत आलो आहोत. त्यानुसार प्रसादातदेखील बदल करण्यात आला आहे. भाविकांनी बल्लाळेश्वराच्या चरणी अर्पण केलेल्या नारळापासून चिक्कीचा प्रसाद तयार करणार आहोत. उपवासालादेखील चिक्की खाता येणार आहे. भाविकांनी या नवीन प्रसादाचा आवर्जून लाभ घ्यावा.