शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

प्री वॉटर कप स्पर्धेत देवळे गाव अग्रेसर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 03:01 IST

पोलादपूर तालुक्यात आयोजित प्री वॉटर कप स्पर्धेत १४ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान केले. यातून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे केली.

पोलादपूर - तालुक्यात आयोजित प्री वॉटर कप स्पर्धेत १४ गावातील ग्रामस्थांनी एकत्र येत श्रमदान केले. यातून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे केली. या स्पर्धेचा निकाल जाहीर झाला असून तालुक्यातील देवळे गावाची प्रथम क्र मांकासाठी निवड करण्यात आली आहे. रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते स्वातंत्र्य दिनी देवळे ग्रामस्थांना प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. यावेळी जि. प. अध्यक्ष अदिती तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर आदी उपस्थित होते.प्री वॉटर कप स्पर्धेतील दुसरा क्र मांक आडवले खुर्द, तर तृतीय क्र मांक कापडे गावाने पटकाविला. पोलादपूर तालुक्यातील देवळे, आडावळे खुर्द, साळवी कोंड, गोवले, खांडज, बोरघर, वडघर बुद्रुक, कामथे, सडवली, काटेतळी, कापडे बुद्रुक, बोरावळे आणि ताम्हाणे या १४ गावांमध्ये प्री वॉटर कप स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्यानंतर श्रमदानास सुरुवात झाली होती. सकाळी आणि संध्याकाळी ग्रामस्थ गावाच्या विकासासाठी, पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रमदान करत होते. स्पर्धा १० एप्रिल ते १५ मे या कालावधीमध्ये राबविण्यात आल्याने गावांमध्ये झालेल्या जलसंधारणाच्या कामांची श्रमदानातून दुरुस्ती करण्यात आली. १४ स्पर्धक गावांमध्ये श्रमदानामधून समतल चर, वृक्ष लागवड, शोषखड्डे, गाळ काढणे आदी कामे करण्यात येणार असून मुंबई, सुरत व पुणेकर ग्रामस्थांच्या सहभागामुळे स्पर्धेसाठी सर्वच गावांमध्ये चुरस निर्माण झाली होती.जल्लोष आमच्या गावाचा... देवळे ग्रामस्थ एकजुटीचाजिल्हाधिकारी रायगड डॉ. विजय सूर्यवंशी यांच्या प्रेरणेतून सुरू झालेल्या ‘प्री वॉटर कप ’ने यंदा पोलादपूरसारख्या डोंगरी दुर्गम भागात पाणीटंचाईवर मात करण्यासाठी श्रमदान केले. सरकारवर अवलंबून न राहता पाणी अडवण्याचा, जिरवण्याचा, वाचवण्याचा आणि जबाबदारीने वापरण्याचा वसा घेऊन कामाला भिडलेल्या या गावांनी जबरदस्त लढत दिली.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणीnewsबातम्या