शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील सहा सागरी बेटांचा होणार विकास, २१४ कोटींचे प्रस्ताव शासनाकडे सादर

By जमीर काझी | Updated: November 16, 2022 09:01 IST

Raigad: ऐतिहासिक वारशाबरोबरच निर्सगरम्य परिसर लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील सागरी बेटांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने आता पुढाकार घेतला आहे.

- जमीर काझी अलिबाग : ऐतिहासिक वारशाबरोबरच निर्सगरम्य परिसर लाभलेल्या रायगड जिल्ह्यातील सागरी बेटांच्या विकासासाठी जिल्हा प्रशासनाने आता पुढाकार घेतला आहे. केंद्र सरकारच्या सागरी बेटांचा सर्वांगीण विकास (एचडीआयपी) या कार्यक्रमांतर्गत निधी आयोगाच्या मार्फत  राबविल्या जाणाऱ्या उपक्रमांतर्गत  विविध सहा बेटांचा विकास करण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.  विविध टप्प्यात राबवावयाच्या या प्रकल्पासाठी एकूण २१४.९८ कोटी खर्च अपेक्षित आहे. 

महाराष्ट्राला ७२० किलोमीटरचा विस्तीर्ण समुद्रकिनारा लाभला आहे. मात्र, पर्यटनवृद्धीच्या दृष्टीने अद्याप  त्याठिकाणी सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे केंद्राच्या ‘एचडीआयपी’ कार्यक्रमांतर्गत  राज्यातील सागरी किनाऱ्याच्या विकासासाठी  विविध योजना, प्रकल्प पाठविण्याच्या सूचना राज्य सरकारला  करण्यात  आल्या  आहेत. त्यासाठी केंद्र सरकारबरोबर समन्वय साधण्यासाठी कोकण विभागाचे आयुक्तांची  संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यांच्या मार्गदर्शनानुसार रायगड जिल्ह्यातील सागरी किनारपट्टीचा विचार करून सहा बेटे विकसित करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  त्यासाठी महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या सागरी बेटांची पाहणी करून सूक्ष्म अहवाल बनविण्यात आला. त्यांच्या सूचनेनुसार त्यामध्ये घारापुरी (एलिपंटा) येथील शेतबंदर ते मोरा बंदर जोडरस्ता, उंदेरी, काळीजे बेट, कासाबेट व विहूर याठिकाणी जेट्टी बांधली जाणार आहे तर राजबंदर येथील पद्मदुर्ग किल्ल्यासाठी जाणाऱ्या जेट्टी व पोहच रस्त्याचे बांधकाम करण्याचे ठरविले आहे.

जिल्ह्यातील सागरी बेट विकसित करण्याबाबत महाराष्ट्र मेरिटाइम बोर्डाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन सूचना केल्या होत्या. त्यानुसार सहा ठिकाणच्या योजनांचे प्रकल्प मंजुरीसाठी पाठविले आहेत. पालकमंत्र्यांकडून त्याला मंजुरी मिळाली असल्याने शासनाकडून त्याला लवकरच मान्यता मिळून ते केंद्राकडे पाठविले जाईल.     - डॉ. महेंद्र कल्याणकर, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :Raigadरायगड