शहरं
Join us  
Trending Stories
1
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
2
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
3
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
4
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
7
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
8
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
9
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
10
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
11
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
12
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
13
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
14
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
15
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
16
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
17
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
18
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
19
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
20
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
Daily Top 2Weekly Top 5

विकास व्हावा; मात्र पर्यावरणाचा बळी नको- सुप्रिया सुळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2020 01:24 IST

विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले.

माणगाव : विकास हा झालाच पाहिजे; पण त्यासाठी पर्यावरणाचा बळी जाता कामा नये, असे उद्गार खासदार सुप्रिया सुळे यांनी साने गुरुजी राष्ट्रीय स्मारकात आयोजित कार्यक्रमाच्या वेळी काढले. वडघर येथील राष्ट्रीय स्मारक येथे आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते करण्यात आले, त्या वेळी त्या बोलत होत्या. पर्यावरणाच्या -हासामुळे आज आपण अनेक संकटांना तोंड देत आहोत. ही संकटे कशामुळे येतात, यासाठी पर्यावरणावर काम करण्याची गरज आहे. अवकाळी पाऊस, गारपिटीमुळे शेतीचे अतोनात नुकसान होत आहे. त्यामुळे त्यामुळे पर्यावरणाचा नाश होऊ नये यांची काळजी घेणे सर्वांचीच जबाबदारी असल्याचे विचार सुळे यांनी मांडले. महाराष्ट्रात आलेले सरकार हे सर्वसामान्य जनतेचे असून, पाच वर्षांत विकासाच्या नावे फरफट होणार नाही, याची काळजी घेणारे सरकार असेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.आंतरराष्ट्रीय समकालीन कला प्रदर्शनाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. कार्यक्रमास राज्यमंत्री आदिती तटकरे, उपसभापती राजेश पानावकर, स्मारक अध्यक्ष कवयित्री नीरजा, माजी अध्यक्ष युवराज मोहिते, उल्का महाजन, कुरैटर राजू सुतार आदी उपस्थित होते.प्रदर्शनामध्ये साकारलेल्या कलाकृतींवर बोलताना सुळे म्हणाल्या, चित्रामध्ये कलाकारांनी आपल्या वेदना व्यक्त केल्या आहेत. इंदापूर ते आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ असा आर्टिस्ट कॉरिडोर करण्यासाठी निश्चित प्रयत्न करणार असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.