शहरं
Join us  
Trending Stories
1
बायजूच्या रवींद्रन यांना अमेरिकेच्या कोर्टाचा मोठा झटका! कोर्टाचे आदेश न पाळल्यामुळे १ अब्ज डॉलरचा दंड
2
G20 शिखर परिषदेने परंपरा मोडली; अमेरिकेच्या बहिष्काराला न जुमानता ठराव मंजूर केला...
3
जानेवारीत लग्न ठरलेले...! २८ वर्षीय महिला डॉक्टरने ९व्या मजल्यावरून उडी मारली, होणाऱ्या नवऱ्याला तिथेच...   
4
बांगलादेश सीमेलगतच्या जिल्ह्यांत मतदारांची संख्या अचानक वाढली; भाजप म्हणतेय मुस्लिम, तृणमूल म्हणतेय हिंदू...
5
एअर इंडिया १३ वर्षांपूर्वी करोडोंचे विमान विसरली; कोणालाच माहिती नव्हती, कोलकाता विमानतळाने...
6
तर ती आज माझ्यासोबत असली असती...! माधुरी दीक्षितसोबत लग्नाच्या मागणीवर सुरेश वाडकर आजही...
7
बाप आहे की राक्षस ! सोबत झोपणाऱ्या १४ वर्षांच्या मुलीवर केले अत्याचार; मुलीने दिला बाळाला जन्म
8
एकनाथ शिंदेंच्या बहिणीने साथ सोडली, अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश; भावाकडून प्रतिसादच मिळेना...
9
हिडमाच्या मृत्यूनंतर नक्षलवादी मोहिमेला मोठा धक्का; 37 नक्षलवाद्यांचे एकाचवेळी आत्मसमर्पण...
10
मुंबई, पुण्यापेक्षा नागपुरात अधिक प्रदूषण ! एक्यूआय इंडेक्सने स्पष्ट, नागरिकांनो ही काळजी घ्या
11
आम्ही नितीश सरकारला पाठिंबा देण्यास तयार आहोत, पण..; असदुद्दीन ओवैसींचे मोठे वक्तव्य
12
हृदयद्रावक! १३ महिन्यांचा मुलगा दूध समजून प्यायला ड्रेन क्लीनर; जीभ भाजली, कायमचा गेला आवाज
13
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
14
खळबळजनक! एक्स्ट्रा मॅरिटल अफेयरसाठी वन अधिकाऱ्याने पत्नीसह २ लेकरांना संपवलं अन्...
15
सेलिब्रेशन! स्मृती मानधनाच्या लग्नापूर्वी वधू-वराचे संघ भिडले; कोण जिंकले, पलाशचे आता काही खरे नाही...
16
G20 मधून जागतिक विकासाच्या मॉडेलवर PM मोदींची टीका; मांडले तीन प्रस्ताव, जाणून घ्या...
17
Video: सोलापूर-हैदराबाद महामार्गावर भीषण अपघात; ३ महिला ठार, तर १२ भाविक गंभीर जखमी
18
महाविकास आघाडीत बिघाडी? मनसेला सोबत घेण्यावरुन संजय राऊतांचा काँग्रेसला टोला
19
माणुसकीच नाही! पत्नीच्या डिलिव्हरीसाठी मागितली सुटी; बॉस म्हणतो, 'वर्क फ्रॉम हॉस्पिटल' कर अन्...
20
भीषण अपघातात प्रसिद्ध पंजाबी गायकाचा मृत्यू, ३७ व्या वर्षीच घेतला जगाचा निरोप, दिली होती अनेक सुपरहिट गाणी
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षण विभागाचे दप्तरच पोलिसांकडे, शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या प्रकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 07:04 IST

रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाचे दप्तरच पोलिसांकडे सुपूर्द केल्याने संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.

अलिबाग - रायगड जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागामध्ये शिक्षकांच्या बदलीसाठी बोगस सह्या करून कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे उघड झाल्यानंतर अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाला आहे. शिक्षण विभागाने या प्रकरणाचे दप्तरच पोलिसांकडे सुपूर्द केल्याने संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. या प्रकरणामध्ये मोठे रॅकेट असल्याने तपास करून भ्रष्टाचाºयांना गजाआड करण्याचे आव्हान अलिबाग पोलिसांपुढे आहे.रायगड जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागातील अज्ञात व्यक्तीने खोटी कागदपत्रे तयार करून त्यावर तत्कालीन मुख्यकार्यकारी अधिकारी दिलीप पांढरपट्टे यांच्या खोट्या सह्या केल्याची बाब समोर आल्यानंतर जिल्हा परिषद हादरली होती. प्रथमदर्शनी २१ शिक्षकांच्या बदलीच्या फायलींवर संशयाची सुई गेल्यानंतर अन्य बदल्यांच्या फायलींवरही तपास यंत्रणेची नजर जाणार असल्याने या प्रकरणातील भ्रष्टाचाराचा खरा आकडा बाहेर येणार आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असल्याने शिक्षण विभागातील एका कर्मचाºयाने सुमारे ४०० ते ५०० शिक्षकांकडून बदल्यांसाठी प्रत्येकी पंचवीस हजारप्रमाणे एक कोटीचा घोटाळा केला असल्याचे बोलले जात आहे. पोलिसांनी खोलात जाऊन तपास केल्यास अनेक मोठी धेंडं यात अडकण्याची शक्यता आहे. या घोटाळ्याच्या सूत्रधारामागे राजकीय आशीर्वाद असल्याशिवाय हा घोटाळा होणे शक्यच नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे आता पोलिसांच्या तपासावरच या घोटाळ्याचे भवितव्य अवलंबून आहे. यामधील खरे सूत्रधार पडद्यावर येणार की पडद्यामागेच राहणार याबाबत रायगडमध्ये उत्सुकता वाढली आहे.या प्रकरणाबाबत पोलिसांकडे तक्र ार दाखल करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पोलिसांना तपास कामात आवश्यक असणारे सर्व दप्तर देण्यात आल्याचे प्रभारी शिक्षणाधिकारी बी.एल. थोरात यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पोलिसांकडे अख्खी जंत्रीच सोपवण्यात आल्याने शिक्षकांच्या बदलीच्या फायली कोणाच्या टेबलावरून गेल्या, त्यावर कोणी-कोणी शेरा मारला याची पोलखोल पोलीस तपासात उघड होणार असल्याने संबंधितांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत.जिल्हा परिषदेच्या कारभाराचे आॅडिट गरजेचेअलिबाग येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संजय सावंत यांनी रायगड जिल्हा परिषदेचा बोगस सह्यांचा कारभार दोन वर्षांपासून सुरू असल्याचा दावा केला होता. सावंत यांच्या म्हणण्यानुसार खरे तर गेल्या दहा वर्षांमधील रायगड जिल्हा परिषदेच्या कारभाराचे कडक आॅडिट सरकारकडून होणे आवश्यक आहे.दहा वर्षांत खर्च झालेल्या सरकारच्या प्रत्येक पै अन् पैचा तपास होण्यासाठी जे अधिकारी कार्यरत आहेत, जे बदलून गेले आहेत वा जे निवृत्त झाले आहेत अशा सर्व अधिकाºयांच्या सह्या तपासून त्या त्यांनीच केल्या आहेत का हे तपासणे आवश्यक असल्याचे मत सावंत यांनी व्यक्त केले आहे. जिल्हा परिषदेमध्ये कोट्यवधींच्या विकासकामांवर निधी खर्च केला जातो. त्याबाबतच्या निघणाºया बिलांवर होणाºया सह्यांबाबतही आता प्रश्नचिन्ह उभे राहिल्याचे बोलले जाते.पदभार थोरात यांच्याकडेया विभागाचे शिक्षणाधिकारी शेषराव बडे हे अचानक रजेवर गेल्याने त्या विभागाचा पदभार बी.एल. थोरात यांना देण्यात आला आहे.त्याचप्रमाणे बडे हे मनमानी कारभार करीत असल्याने त्यांना कार्यमुक्त करण्याचा ठराव जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत मांडण्यात आला होता.त्यानंतर हे प्रकरण बाहेर आल्याने रजेवर गेलेल्या बडे यांना हजर करून घेण्याबाबत पदाधिकारी उत्सुक नसल्याचे विश्वसनीय वृत्त आहे.शिक्षण विभागातील या प्रकाराबाबतचा तपास योग्य पध्दतीने सुरू आहे.- सुरेश वराडे,पोलीस निरीक्षकशिक्षण विभागातील एका कर्मचाºयाने सुमारे ४०० ते ५०० शिक्षकांकडून बदल्यांसाठी प्रत्येकी पंचवीस हजारप्रमाणे एक कोटीचा घोटाळा केला असल्याचे बोलले जाते.

टॅग्स :Teacherशिक्षक