शहरं
Join us  
Trending Stories
1
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
2
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
3
बीएसएफ जवानांची बस दरीत काेसळली; तिघांचा मृत्यू
4
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
5
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
6
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
7
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
8
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
9
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर
10
एसटी बसला समाेरून धडकला ट्रक, सहा जणांचा मृत्यू; २० जण गंभीर जखमी, मृतांत तीन महिला
11
तिसऱ्या भिडूंच्या दंडबैठका; आघाडी अजून अपूर्ण
12
आयटीवाल्यांना पुढील वर्षी भरभरून पगारवाढ नाहीच; आघाडीच्या कंपन्या देणार ५ ते ८ टक्के वाढ
13
सणासुदीच्या तोंडावर तेल महागाईची चाहूल; अनेक जीवनावश्यक वस्तू चढ्या दराने
14
एसआरएतील इमारती म्हणजे उभ्या झोपड्याच, उच्च न्यायालय; प्रकल्प राबवताना अधिकारांचे उल्लंघन
15
विनेशने काँग्रेसकडून तिकीट घेतले, तेच टोचले!
16
‘जे. जे.’ नर्सिंग होमला येणार कॉर्पोरेट लूक; खासगी रुग्णालयाप्रमाणे रचना, रुग्णांसाठी अत्याधुनिक सुविधा
17
टीम इंडिया बांगलादेशवर भारी, पण 'कर्णधार' रोहित शर्माच्या नावे झाला लाजिरवाणा विक्रम
18
काश्मिरातील बडगाममध्ये BSF च्या जवानांनी भरलेली बस दरीत कोसळली, चार जणांचा मृत्यू अनेक जखमी
19
तिरुपती लाडू वाद, जगन मोहन रेड्डींची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “PM, CJI ना पत्र लिहिणार”
20
प्रेयसीने मागितले ६ लाख! विवाहित व्यक्तीने उचललं टोकाचं पाऊल; पत्नीला पाठवला Video

माउली कन्स्ट्रक्शनवर गुन्हा दाखल करण्याची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 1:32 AM

उरण तालुक्यातील कोप्रोली येथे मे. दादाजी धाकजी लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीसाठी मे. माउली कन्स्ट्रक्शनने अवैधरीत्या चालविलेल्या सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे

अलिबाग : उरण तालुक्यातील कोप्रोली येथे मे. दादाजी धाकजी लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीसाठी मे. माउली कन्स्ट्रक्शनने अवैधरीत्या चालविलेल्या सुरुंग स्फोटामुळे ग्रामस्थांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाने संबंधितांवर कारवाईचा बडगा न उगारता केवळ त्याला सुरुंग स्फोट न करण्याबाबत फटकारले आहे. मात्र, सुरुं गाचे स्फोट सुरूच असल्याने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. कंपनीच्या मालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी जुई ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.दादाजी धाकजी लॉजिस्टिक प्रा. लि. या कंपनीसाठी माउली कन्स्ट्रक्शनने सुरुं ग स्फोट करण्यासाठी महसूल प्रशासनाची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. संबंधित कंपनीने रॉयल्टीही भरली नसल्यामुळे त्यांचे कृत्य बेकायदा आहे, असे निवेदनात नमूद केले आहे. तक्र ारदार मनोहर पाटील आणि अनंत पाटील यांच्या राहत्या घरांच्या शेजारी असलेल्या मौजे कोप्रोली येथील वनखात्याच्या संरक्षित वनांच्या जागेत, तसेच सर्व्हे नं. २७/१ अ, २७/१ब, २७/४, २७/५अ/१, २७/५अ/३ व सर्व्हे नं. २८/१ या मिळकतीमध्ये कोणालाही पूर्वकल्पना न देता, बेकायदा सुरुंग स्फोट केलेजात आहेत. या स्फोटांमुळे डोंगरावरून वाहणाºया नैसर्गिक जलाशयाचेस्रोत कायमचे नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. सुरुं ग स्फोटामुळे तक्र ारदारांच्या जीवितास धोका निर्माण झालाआहे. केव्हाही दुखापत होऊन कधीहीभरून न येणारे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात नमूद केले आहे.सुरुं गांचे स्फोट घडविताना येथील ग्रामस्थांना सुरक्षित राहणेबाबतची कोणतीही पूर्वकल्पना देण्यात येत नाही, असा आरोप तक्र ारदारांनी केला आहे.तक्र ारदार यांनी कोकण विभागाचे उपायुक्त महेंद्र वारभुवन यांच्याकडे तक्रार अर्ज दाखल केला होता. त्या अनुषंगाने सदरच्या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन तक्र ारदाराच्या अर्जावर तत्काळ कारवाई करावी, असे आदेश रायगडच्या जिल्हाधिकाºयांनी १९ जानेवारी २०१८ रोजीच्या पत्राने दिले आहेत. याआधी तक्रारदारांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्र ार दाखल केली होती.तहसीलदार उरण यांनी कोप्रोली मंडळ अधिकाºयांनी केलेल्या पंचनाम्याची दखल घेत सुरुंग स्फोटामुळे जीवित व वित्तहानी झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी मे. दादाजी धाकजी लॉजिस्टिक आणि माउली कन्स्ट्रक्शन यांच्यावर राहील, अशी लेखी नोटीस उरण तहसीलदारांनी दिली आहे.नोटीस देऊनही माउली कन्स्ट्रक्शनचे मालक आजही बेकायदा सुरुं ग स्फोट घडवत आहेत, ते महसूल प्रशासनाबरोबरच कायद्यालाही जुमानत नाहीत असे तक्रारदारांचे म्हणणे आहे.