शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
2
ठाकरे बंधूंच्या पॅनेलला टक्कर देण्यासाठी देवेंद्र फडणवीसांनी २ शिलेदारांवर सोपवली जबाबदारी
3
भारताच्या स्वातंत्र्याने खलिस्तान्यांना होतोय त्रास; ऑस्ट्रेलियाच्या रस्त्यांवर गोंधळ घातला
4
पाकिस्तानमध्ये हाहाकार! ढगफुटी, पूर आणि भूस्खलनात ४१ लोकांचा मृत्यू, असंख्य बेपत्ता; पाचशे पर्यटक अडकले
5
प्रियकराची ओढ, पत्नीचं संसाराकडे दुर्लक्ष; त्यानंतर पतीने जे केले..., सासरचे जावयावरच उलटले
6
सुदर्शन चक्र, दहा वर्षात तयार होणार भारताचं स्वदेशी सुरक्षा कवच, सर्व शस्त्रास्त्रे ठरणार निष्प्रभ, अशी आहे योजना
7
“जालना, मुंबई, दिल्लीत कुठेही आंदोलन कर, पण...”; जरांगेंच्या निर्धारावर भुजबळ स्पष्टच बोलले
8
'दहा मृतदेह आम्ही स्वतःच बाहेर काढले, अजूनही लोक मातीखालीच...'; चशोटीत आक्रोश, मन्न सुन्न करणारे अनुभव
9
"त्यांनी माझे गाल ओढले, दंडाला चिमटे काढले...", हळदीकुंकूच्या कार्यक्रमाला गेलेल्या प्रिया बेर्डेंना चाहत्यांकडून आलेला धक्कादायक अनुभव
10
क्रिकेटरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी दिसणार सलमान खानच्या 'बिग बॉस १९'मध्ये?, जाणून घ्या याबद्दल
11
"भारत-पाक संघर्ष अणुयुद्धात बदलला असता, मी होतो म्हणून..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा 'तो' दावा कायम
12
शशी थरूर 'क्लीन बोल्ड'! एका तरूणाच्या इंग्रजी ट्विटने काढली 'विकेट', रिप्लाय देत म्हणाले...
13
जन्माष्टमी २०२५: ‘या’ राशींवर श्रीकृष्ण कृपा, पैसे कमी पडत नाहीत; सुबत्ता-वैभव-भरभराट लाभते!
14
राजा रघुवंशीच्या घरी अचानक पोहोचला पोलिसांच्या वेशातील व्यक्ती; कुटुंबाला आला संशय, तपास करताच धक्कादायक सत्य उघड
15
७ वर्षांनी डोनाल्ड ट्रम्प आणि पुतिन भेट होणार; ३२ हजार सैन्य तैनात, ३०० किमी परिसरात 'नो फ्लाय झोन'
16
"कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसांची..."; 'या' महापालिकांमध्ये मनसे-शिवसेना एकत्र लढणार?
17
PM मोदींनी सर्व रेकॉर्ड मोडले, लाल किल्ल्यावर १०३ मिनिटे भाषण केले; पाहा, १० मोठे मुद्दे
18
"युवराज्ञींना येणं भाग पडलं...", प्राजक्ता-शंभुराजच्या साखरपुड्याला आली भोसले राजघराण्यातील महत्त्वाची व्यक्ती, अभिनेत्रीची खास पोस्ट
19
सूरज चव्हाणला पक्षात बढती, अजित पवार म्हणतात, "मला माहिती नाही..."; सुनील तटकरेंचा वेगळाच दावा
20
“स्वातंत्र्य चळवळ अन् RSSचा संबंध काय? PM मोदी पुन्हा लाल किल्ल्यावरून खोटे बोलले”: सपकाळ

रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोर : १० गावांना भूसंपादनाची सक्ती नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2017 06:15 IST

रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोरअंतर्गत दिघी पोर्ट क्षेत्रातील ७८ पैकी ६८ गावे विनाअधिसूचित करण्याबाबत प्रस्ताव दिला असून उर्वरित १० गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाही.

- जयंत धुळप अलिबाग : रायगड जिल्ह्यातील दिल्ली-मुंबई कॉरिडोरअंतर्गत दिघी पोर्ट क्षेत्रातील ७८ पैकी ६८ गावे विनाअधिसूचित करण्याबाबत प्रस्ताव दिला असून उर्वरित १० गावांना शासनाची भूसंपादनाची कोणतीही सक्ती होणार नाही. संमतीपत्रातील भाषा देखील सौम्य करण्यात येईल. आणि ज्या शेतकऱ्यांची संमती असेल त्यांचीच जमीन घेतली जाईल,असे प्रतिपादन शुक्रवारी राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत केले. यामुळे शेतकरी बांधवांना आता दिलासा मिळणार असल्याचे सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. या निर्णयामुळे तब्बल २ हजार ५०० शेतकरी कुटुंबांनी सुटकेचा नि:श्वास टाकला असल्याचे त्या म्हणाल्या.शिवसेनेच्या प्रवक्त्या व उपनेत्या आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी ही माहिती सभागृहास दिली. ६८ गावांमधील जमिनी विना अधिसूचित करून तेथील जमिनीवर भूसंपादनाचे मारलेले शिक्के विनाअट काढण्यात येतील का, तसेच ज्या १० गावांमध्ये आता सक्ती केली जात आहे ती सक्ती थांबवण्यात येईल का असा प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. शेतकºयांचे आक्षेपार्ह संमतीपत्र व त्यातील आक्षेपार्ह तरतुदीचा पुनर्विचार करण्याची मागणी करून, सन २०१३ च्या कायद्यानुसार शेतकºयांना अभिप्रेत असलेला लाभ त्यांना मिळत नाही याकडे आमदार डॉ. नीलम गोºहे यांनी लक्ष वेधून बेकायदा घेण्यात आलेली अशी संमतीपत्रे त्वरित रद्द करून सक्तीचे भूसंपादन थांबविणार का? असाही प्रश्न त्यांनी केला होता.गावठाण व भातशेती वगळण्यात आलेली नाही. हे क्षेत्र वगळण्यात बाबत त्वरित काटेकोर कारवाई होईल का? १० गावांतील सुरू असलेले भूसंपादन जबरदस्तीने न करता ते पूर्णपणे थांबविण्यात येईल का? असेही प्रश्न त्यांनी उपस्थित केले. त्यावर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी उत्तर देताना म्हणाले, रोहा-माणगाव, पानसई व वावे दिवाळी, निजामपूर व पळसगाव औद्योगिक क्षेत्रातील एकूण ५१३०.१८८ हेक्टर आर जमिनीस संमती मिळाली असून, उर्वरित क्षेत्रासाठी शेतकरी स्वखुशीने संमती देत आहे. नवीन भूसंपादन धोरणानुसार एकूण १० गावांमधून ५० टक्के संमती मिळली आहे. ज्या शेतकºयांची अद्याप भूसंपादनासाठी संमती मिळालेली नाही, त्यांची संमती प्राप्त करून घेण्याचे काम उप विभागीय अधिकारी, माणगाव आणि उपजिल्हाधिकारी भूसंपादन काळ प्रकल्प माणगाव यांच्यामार्फत चालू आहे. हे भूसंपादन करताना शेतकºयांवर सक्ती न करण्याची सूचना यावेळी केली.शेतकरी जमीन दराचा पुनर्विचार करणारहा प्रकल्प केंद्र सरकार पुरस्कृत असल्याने केंद्राच्या महामंडळाकडे याविषयी राज्य शासनाकडून प्रस्ताव देण्यात येईल. त्यांच्याकडून या भागातील जमिनीअधिसूचित न करण्याबाबत संमती आल्यावर याविषयीची अधिसूचना जाहीर करण्यात येईल.मात्र शुक्रवारपासून रायगड जिल्ह्यातील या प्रकल्पाअंतर्गत कोणतेही सक्तीचे भूसंपादन केले जाणार नाही. ज्यांची संमती आहे त्यांचेच संपादन केले जाईल. सक्ती कोणावरही केली जाणार नाही.शेतकऱ्यांना देण्यात येणाºया मोबदल्याच्या पाच वर्षापूर्वीचा दर असल्याने त्याविषयी देखील पुनर्विचार करण्यात येईल. याबाबत २०१३ चा कायदा विचारात घेण्यात येईल.रायगड जिल्ह्यात कोणतेही रासायनिक प्रकल्प स्थापन करण्याचा निर्णय झालेला नाही, अशीही माहिती उद्योगमंत्र्यांनी दिली. या विषयी एक बैठक घेण्याची मागणी आ. डॉ. नीलम गोºहे यांनी सदनात केली. यावेळी आमदार सुनील तटकरे यांनीही आपली मते मांडली.या प्रश्नाबाबत शेतकºयांना संघटित करुन आ.डॉ.गोºहे यांच्या माध्यमातून सामाजिक कार्यकर्त्या उल्का महाजन यांनी सरकारकडे पाठपुरावा केला होता.