शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

साखरचौथच्या गणरायाला निरोप, जिल्ह्यातील 630 गणपतींचे विसर्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2017 06:50 IST

रायगड जिल्ह्यातील २६८ सार्वजनिक आणि ३६२ खासगी, अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका हे अलिबाग शहरातील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील २६८ सार्वजनिक आणि ३६२ खासगी, अशा एकूण ६३० साखरचौथ गणपतीच्या मूर्तींचे रविवारी विसर्जन करण्यात आले. ढोल-ताशांच्या तालावर निघालेल्या मिरवणुका हे अलिबाग शहरातील विसर्जन मिरवणुकीचे वैशिष्ट्य आहे.भक्तांच्या घरात गणेशोत्सवाच्या दिवशी गणरायाची मूर्ती पोहोचत नाही, तोपर्यंत ते मूर्तिकार कामामध्ये अडकलेले असतात. त्यामुळे त्यांना गणेशोत्सव साजरा करता येत नाही. त्यांनाही गणरायाची भक्तिमय सेवा करता यावी. त्यांनाही हा उत्सव साजरा करता यावा, यासाठी गणेश चतुर्थीनंतर येणाºया पहिल्या संकष्टी चतुर्थीला साखरचौथ गणपती उत्सव साजरा करण्याची परंपरा सुरू झाली आहे; पंरतु अलीकडे या उत्सवाचे स्वरूप बदलले असून वाढलेले असल्याचे दिसून येते.शनिवारी वाजत-गाजत दीड दिवसांच्या गणरायाचे आगमन झाले होते. सकाळपासूनच विविध कार्यक्र माची रेलचेल विविध मंडळांमध्ये दिसून आली. रविवारी बाप्पाला निरोप देण्यात आला. अलिबाग शहरातील ठिकरु ळ नाका, श्रीबाग, चेंढरे यासह अन्य मंडळांनी बाप्पाच्या निरोपाची जय्यत तयारी केली होती.जिल्ह्यामध्ये खासगी गणरायाच्या मूर्तीचे विसर्जन सायंकाळी ५ वाजता सुरू झाले होते, तर सार्वजनिक मंडळांनी सायंकाळी ७ वाजल्यापासून बाप्पाच्या मिरवणुका काढल्याहोत्या.तलाव, समुद्र अशा ठिकाणी बाप्पाच्या मूर्तींचे विसर्जन करण्यात आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.महाडमध्ये लोकविकासच्या गणेशाचे विसर्जनमहाड : माजी आ. माणिक जगताप संस्थापक असलेल्या लोकविकास सामाजिक संस्थेच्या साखरचौथ गणरायाचे रविवारी भव्य मिरवणुकीने रात्री उशिरा विसर्जन करण्यात आले. विरेश्वर मंदिर येथे साखरचौथ गणरायाची काल प्रतिष्ठापना करण्यात आली होती. या मिरवणुकीत कार्यकर्ते खास लेझीम पथकासह सहभागी झाले होते.

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव