शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघातातील मृतांचा आकडा वाढला; डॉक्टर, विद्यार्थी, नातेवाईकांचे मृतदेह सापडले
2
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
3
Lalbaugcha Raja 2025: लालबागच्या राजाचा पाद्य पूजन सोहळा थाटात संपन्न! यंदा मंडळाचे ९२ वे वर्ष
4
कशी होणार हवाई प्रवाशांची सुरक्षा? ‘स्टाफ’वर कामाचा मोठा ताण; ‘डीजीसीए’त ४८% पदे रिक्त
5
अपघातानंतर विमान उद्योगावर आले संकटाचे ढग; प्रवासी घटण्याची भीती
6
आजचे राशीभविष्य : १४ जून २०२५; कार्यालयीन कामासाठी प्रवास घडेल, व्यापारात फायदा होईल
7
"अजूनही लोक वाचू शकले असते, परंतु...", विमान अपघातात वाचलेल्या एकमेव प्रवाशाने केला दावा
8
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
9
विमान प्रवास आता पूर्वीइतका धोकादायक नाही? अशी आहे मागच्या काही दशकांतील आकडेवारी
10
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
11
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
12
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
13
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
14
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
15
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
16
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
17
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
18
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
19
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
20
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 

कळंबोलीतील सिलिंडर स्फोटात पाच वर्षीय मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2018 01:46 IST

कळंबोली सेक्टर ३ मधील एलआयजी वसाहतीमध्ये गुरुवारी पहाटे सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये सोहम कट्टे या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे.

अरुणकुमार मेहत्रे  कळंबोली : कळंबोली सेक्टर ३ मधील एलआयजी वसाहतीमध्ये गुरुवारी पहाटे सिलिंडरचा स्फोट झाला. यामध्ये सोहम कट्टे या पाच वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला आहे. चार जण जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे. स्फोटामुळे दोन घरांच्या भिंती पडल्या असून बाहेरील दोन वाहनांचेही नुकसान झाले आहे.येथील एलआयजी कॉलनीत राहणाऱ्या नाना जाधव यांच्या घरामध्ये ही घटना घडली. पहाटे साडेसहा वाजण्याच्या सुमारास जाधव यांच्या पत्नी अश्विनी किचनमध्ये गेल्या. घरात गॅसगळती झाल्याचे त्यांच्या लक्षात आले नाही. गॅस पेटविण्यासाठी लायटर लावताच अचानक स्फोट झाला. यामध्ये अश्विनी यांचा चेहरा व हात भाजला आहे. त्यांचे पती नाना हेही जखमी झाले आहेत. स्फोटामुळे दोन घरांच्या मधील सामाईक भिंत पडली.शेजारच्या घरात झोपलेला पाच वर्षांचा मुलगा सोहम कट्टे याच्या चेहºयावर दगड पडून तो जखमी झाला व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. सोहमचे वडील बबन व आई शुभांगी कट्टे हेही जखमी झाले आहेत. स्फोटानंतर उडालेल्या विटांमुळे रोडवर उभ्या असलेल्या स्कॉर्पिओ जीप व एक मोटारसायकलचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. स्फोटानंतर परिसरातील नागरिकांनी मृत मुलगा व जखमींना तत्काळ एमजीएम रुग्णालयात उपचारासाठी नेले आहेत. कट्टे कुटुंबीय हे माण तालुक्यातील गोंदवले येथील मूळ निवासी आहेत. स्फोटाचे वृत्त समजल्यानंतर कट्टे व जाधव यांच्या नातेवाइकांनी घटनास्थळी व रुग्णालयात गर्दी केली होती.पहाटे झालेल्या स्फोटामुळे कळंबोलीसह पनवेल परिसरामध्ये खळबळ उडाली होती. नक्की कशाचा स्फोट झाला हे न समजल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. काही क्षणात घटनास्थळी शेकडो नागरिकांनी धाव घेतली होती. दोन घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. घरात साहित्य अस्ताव्यस्त पसरले होते.