शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

धोत्रेवाडीतील अंगणवाडीची दैना, अंगणवाडी भरतेय समाजमंदिरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 02:26 IST

कर्जत : तालुक्यातील धोत्रेवाडी येथील अंगणवाडी शाळेची इमारत नादुरुस्त असल्याने, सध्या अंगणवाडी समाजमंदिरात भरविली जात आहे.

संजय गायकवाडकर्जत : तालुक्यातील धोत्रेवाडी येथील अंगणवाडी शाळेची इमारत नादुरुस्त असल्याने, सध्या अंगणवाडी समाजमंदिरात भरविली जात आहे. पाच वर्षांपूर्वी दुरुस्त केलेली अंगणवाडी इमारत कधीही कोसळू शकते, अशा स्थितीत असून कर्जत पंचायत समितीच्या सदस्या जयवंती हिंदोळा यांच्या गावच्या असलेल्या इमारतीबाबत प्रशासन कोणता निर्णय घेणार? याकडे लक्ष लागून राहिले आहे.तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमध्ये धोत्रेवाडी हे गाव असून, त्या ठिकाणी आदिवासी समाजाची वस्ती आहे. धोत्रेवाडी आणि बोरीची वाडी या आदिवासी वाडीमधील बालकांसाठी तेथील जिल्हा परिषदेच्या शाळेच्या आवारात अंगणवाडी इमारत आहे. २००५मध्ये बांधलेल्या अंगणवाडी शाळेची इमारत नादुरु स्त झाल्याने दोन्ही वाड्यांमधील ४५-५० बालके समाजमंदिरात भरविण्यात येत असलेल्या अंगणवाडीमध्ये येत असतात. इमारत नादुरु स्त झाल्याने कर्जत पंचायत समितीच्या माध्यमातून २०१२मध्ये इमारतीची दुरु स्ती करण्यात आली होती; परंतु छपरातून गळणारे पाणी, भिंतींना गेलेले तडे, मोडकळीस आलेले दरवाजे यामुळे त्या ठिकाणी लहान बालकांना तीन तास बसविणे शक्य नसल्याने ग्रामस्थांनी २०१६मध्ये अंगणवाडी शाळा भरविण्यासाठी समाजमंदिर उघडून दिले. दोन कुपोषित बालके असलेल्या या धोत्रेवाडी अंगणवाडी केंद्राची इमारत नव्याने उभारण्याची गरज आहे.कर्जत पंचायत समितीच्या सदस्या जयवंती हिंदोळा यांचे धोत्रेवाडी हे गाव असून, त्यांच्या राजकीय कारकिर्दीच्या दृष्टीने अंगणवाडी इमारत हा महत्त्वाचा टप्पा बनला आहे. त्यातच अंगणवाडी समाजमंदिरात हलविण्यात आल्यानंतर शाळेच्या इमारतीची लाकडे, खिडक्या, पत्रे आदी साहित्य काढून नेण्यात आले आहे. आता केवळ त्या इमारतीचा सांगाडा शिल्लक राहिला असून, ग्रामपंचायत प्रशासन आणि जिल्हा परिषद लक्ष देणार आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. जिल्हा परिषदेकडे अंगणवाड्यांच्या इमारती उभारण्यासाठी मोठ्या प्रमाणात निधी असताना तालुक्यातील धोत्रेवाडी सारख्या अनेक अंगणवाड्यांच्या इमारती नादुरु स्त कशा राहतात? असा प्रश्न उपस्थित होतो.>आमच्या विभागात जांभुळवाडी, सराईवाडी, जांबरूग येथील अंगणवाड्यांची अवस्था बिकट असून, कोणत्याही वेळी कोसळू शकते. दुसरीकडे धोत्रेवाडी येथील अंगणवाडी समाजमंदिरात भरविली जात असताना ठोंबरवाडीमधील अंगणवाडी इमारतीची अवस्था बिकट असल्याने घरात अंगणवाडी भरविली जाते, अशी चिंताजनक स्थिती आहे.- जयवंती हिंदोळा, सदस्या, कर्जत पंचायत समिती.

टॅग्स :Raigadरायगड