शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

बंधाऱ्याच्या दुरवस्थेमुळे धोका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2019 00:31 IST

महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे.

- सिकंदर अनवारे दासगाव : महाड तालुक्यातील बिरवाडीजवळ असलेल्या खरवली येथील कोल्हापूर बंधाºयावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. बंधाºयावरील मार्गावर खड्डे पडले असून ऐन पावसाळ्यात पुराचे पाणी गेल्याने बंधाºयाचे नुकसान झाले आहे. या बंधाºयाच्या एका बाजूचा माती भराव मोठ्या प्रमाणात वाहून गेला आहे. यामुळे विद्यार्थी आणि नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण झाला असला तरी लघू पाटबंधारे विभागाने या मार्गावरील वाहतूक सुरूच ठेवली आहे.कोल्हापूर पद्धतीने बांधलेल्या या बंधाºयावरून खरवली आणि बिरवाडी या दोन्ही गावांतील ग्रामस्थ ये-जा करतात. खरवली आणि बिरवाडीमध्ये असलेल्या शाळांमधील विद्यार्थीदेखील या मार्गाचा वापर करतात. बंधाºयावरील मार्ग अत्यंत खराब आणि खाचखळग्यांचा झाला आहे. ज्या नदीवर हा बंधारा बांधला आहे त्या काळ नदीचे पात्र आणि पाण्याचा प्रवाह ऐन पावसाळ्यात रौद्र रूप धारण करून असतो. प्रचंड आवाज करीत पाण्याचा प्रवाह येथून सावित्री नदीला मिळतो. अनेकवेळा या बंधाºयावरूनदेखील पाणी जाते. अशा वेळी हा मार्ग बंद होतो. काही दिवसांपूर्वी या बंधाºयावरून पाणी गेल्याने मोठे वृक्ष यावर आदळले गेले आहेत. काही वृक्ष या ठिकाणी अडकले आहेत. यामुळे हा बंधारा धोकादायक बनला आहे. या बंधाºयावरून यापूर्वीच अवजड वाहतूक बंद केली आहे. मात्र तरीदेखील अनेक वेळा मोठी वाहने यावरून ये-जा करीत असतात. येथील लघू पाटबंधारे विभागाचे सुरक्षा विभाग कार्यालयदेखील बंद आहे. त्याचीदेखील मोडतोड झाली आहे. बंधाºयाच्या एका बाजूचा माती भरावदेखील वाहून गेला आहे. यामुळे हा मार्ग बंद करणे गरजेचे असतानादेखील याकडे संबंधित विभागाने कानाडोळा केला आहे. यामुळे ये-जा करणारे विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना धोका निर्माण झाला आहे.बिरवाडी गावाजवळ काळ नदीवर कोल्हापूर पद्धतीने सन १९७६ रोजी बंधारा बांधण्यात आला होता. या बंधाºयामुळे बिरवाडी आणि परिसरातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्न सुटला आहे. या बंधाºयातील पाणीसाठ्यापैकी काही भाग सिंचनाकरितादेखील राखीव आहे. महाड औद्योगिक क्षेत्रातील नागरिकांनादेखील याच पाण्याचा वापर करता येतो. १.६९ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा यामध्ये होत असून ४.५६ हेक्टर क्षेत्र बुडीत गेले आहे. प्रतिवर्षी सिंचन आणि पाणीपुरवठा यातून लघू पाटबंधारे विभागाला किमान ६० लाख रुपयांचे उत्पन्न होत असले तरी या बंधाºयाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. लोखंडी प्लेट्स आणि मजबुतीकरण याकरिता सन २०१४ मध्ये लाखो रुपये खर्च करण्यात आले, मात्र या बंधाºयावरील मार्गाची दुरुस्ती करण्यात आली नाही.>मागच्या दोन वर्षांत धरणाच्या वरच्या बाजूला काँक्रिटची दुरुस्ती आणि खालील स्टील काँक्रिटची दुरुस्ती याचे अंदाजपत्रक तयार करण्यात आले आहे. मान्यता मिळत नसल्याने ते काम थांबले आहे. या वर्षी वरचे काँक्रिट दोन्ही ठिकाणी वाहून गेल्यामुळे दुरुस्तीसाठी वरील कार्यालयाकडे अंदाजपत्रक पाठविण्यात आले आहे. मान्यता मिळताच काम केले जाईल.- प्रकाश पोळ,शाखा अभियंता, लघू पाटबंधारे विभाग