शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
3
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
4
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
5
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
6
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
7
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
8
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
9
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
10
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
11
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
12
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
13
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
14
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
15
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
16
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
17
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
18
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
19
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
20
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल तालुक्यातील १९५० घरांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2020 00:08 IST

वैभव गायकर । लोकमत न्यूज नेटवर्क पनवेल : निसर्ग वादळाने पनवेलमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे जीवितहानी झाली ...

वैभव गायकर ।लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : निसर्ग वादळाने पनवेलमध्ये मोठे नुकसान झाले आहे. या वादळामुळे जीवितहानी झाली नसली तरी हजारो घरांचे नुकसान झाले आहे. १२००च्या आसपास झाडे कोलमडून पडली असून मोठ्या संख्येने विजेचे खांब कोसळले असल्याने तालुक्यात मोठे नुकसान झाले आहे.ग्रामीण भागाला या तडाख्याचा मोठा फटका बसला असून घरांचे मोठे नुकसान झाले असल्याची माहिती तहसीलदार अमित सानप यांनी दिली. तालुक्यात सुमारे ३५० विजेचे खांब कोसळल्याने अनेक ठिकाणचा विद्युतपुरवठा दोन दिवसांपासून खंडित आहे. वादळी वाऱ्यामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. जवळजवळ ५० हेक्टरमधील शेती प्रभावित झाली आहे. बुधवारी दुपारी आलेल्या या वादळामुळे खारघर शहरातील मुर्बी गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेची पडझड झाली आहे. शाळेची भिंत, छप्पर पूर्णपणे कोसळले आहे. खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल, खांदा कॉलनी तसेच ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली आहेत.आज पाणीपुरवठा खंडितएमजीएपीच्या भोकारपाडा जलशुद्धीकरण केंद्राला वीजपुरवठा करणाºया वीजवाहिन्यांवर अनेक ठिकाणी झाडे कोलमडून पडल्याने त्या दुरु स्त करण्यास दोन दिवसांचा कालावधी लागणार आहेत. यामुळे नवीन पनवेल, कळंबोली, पनवेल, करंजाडे येथील पाणीपुरवठा५ जूनला बंद राहणार आहे. ६ जून रोजी कमी दाबाने पाणीपुरवठा सुरू होईल, अशी माहिती सिडकोच्या वतीने देण्यात आली आहे.पनवेल तालुक्यात मोठ्या प्रमाणात या वादळामुळे नुकसान झाल्याचे समोर आले आहे. झालेल्या नुकसानीचे अहवाल तयार करण्याचे काम सुरू आहे. घरांचे नुकसान झालेल्यांना शासनाकडून मदत मिळेल.- अमित सानप, तहसीलदार, पनवेल