शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

सायकल चालवा किंवा धावा: व्यायामाचे महत्त्व पटण्यासाठी सरकारचा उपक्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 27, 2020 23:47 IST

रायगडमध्ये २९ ऑगस्टला फिट इंडिया फ्रीडम रन

रायगड : व्यायामाचे महत्त्व पटण्यासाठी सरकारकडून देशभरातील नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा उपक्रम रायगड जिल्ह्यात २९ आॅगस्ट रोजी सर्वत्र राबविण्यात येणार आहे.

केंद्रीय युवा व खेल मंत्रालय, नवी दिल्ली यांनी पुढाकार घेऊन ‘फिट इंडिया फ्रीडम रन’ हा नवीन उपक्रम राबविण्याचे नियोजन केले आहे. या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, रायगड जिल्ह्यातील खेळ संघटना यांच्याकडून संयुक्तरीत्या २९ ऑगस्ट रोजी राबविण्यात येणार आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी संजय महाडिक यांनी दिली.

या उपक्रमामध्ये इच्छुक नागरिक कोठेही, कधीही धावू ,चालू शकतात किंवा सायकलिंग करू शकतात, अशी या उपक्रमामागील संकल्पना असल्याचे त्यांनी सांगितले. प्रत्येक जण धावण्यासाठी, चालण्यासाठी, सायकलिंगसाठी आपल्या आवडीचा मार्ग, व्यक्तीश: अनुकूल वेळ आणि ठिकाण निवडू शकतात. स्वयंचलितपणे किंवा कोणत्याही ट्रॅकिंग अ‍ॅप किंवा जीपीएस घड्याळाचा वापर करून धावलेल्या, चाललेल्या, सायकलिंग केलेल्या अंतराची नोंद घेता येणार आहे. अ‍ॅप वापरणे शक्य नसल्यास क्रिया पूर्ण झाल्यानंतरचा फोटो यापैकी एक संबंधित http://raigadsports.blogspot.com/ ब्लॉगवर अपलोड करावे. सर्वांनी धावणे, चालणे, सायकलिंग ही क्रिया पूर्ण केल्यानंतर दिलेल्या लिंकवरून फॉर्म भरावा.डिजिटल प्रमाणपत्र देणारउपक्रमात सहभागी होणाऱ्या नागरिकांना केंद्र सरकारचे डिजिटल प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. हे प्रमाणपत्र http://raigadsports.blogspot.com/ या लिंकवरून ३१ ऑगस्टपासून डाऊनलोड करून घेता येईल, असेही महाडिक यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्स