शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
बिहारच्या सारणमध्ये मतदानाच्या दुसऱ्या दिवशी हिंसा, गोळीबार; एकाचा मृत्यू, दोन जखमी
3
लोकसभा : संसदेची सुरक्षा CRPF कडून CISF ने ताब्यात घेतली; कारण काय...
4
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियामध्ये तेजी, नेस्ले घसरला
5
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
6
'निवडणूक आयोगाचे मोदींच्या घरगड्यासारखे काम'; उद्धव ठाकरेंच्या आरोपानंतर भाजपने दाखल केली तक्रार
7
इराणच्या राष्ट्रपतींचा अपघात झाला की घातपात? हेलिकॉप्टर अपघाताचे हे आहे रहस्य
8
मुंबईत मतदान केंद्रावर ठाकरे गटाच्या बूथ एजंटचा धक्कादायक मृत्यू; टॉयलेटमध्ये आढळला मृतावस्थेत
9
खवळलेल्या समुद्रातून २४ पर्यटकांची सुटका, दोन तास थरार, तटरक्षक दलाच्या शाैर्याचे सर्वत्र काैतुक
10
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
11
RBI गव्हर्नर की SBI प्रमुख; कोणाचं वेतन आहे जास्त, पाहा कोणाचं किती आहे शिक्षण?
12
विदेशी नोकरीच्या आमिषाने फसवणुकीचा धंदा जोरात, परराष्ट्र मंत्रालयाकडून सावधगिरीचा इशारा
13
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
14
बलात्कारानंतर जिवंत जाळले, दाेघांना फाशी
15
आता औषधे संशयाच्या भोवऱ्यात; दर्जाबाबत शंका आल्याने भारतीय कंपन्यांची उत्पादने परत पाठविली
16
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
17
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
18
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
19
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
20
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक

बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी; पालीत वाहतूककोंडीची डोकेदुखी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2018 11:30 PM

दिवाळी सुट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या दररोज जवळपास पाच हजार भाविक बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आहेत.

पाली : दिवाळी सुट्यांमुळे अष्टविनायकाचे स्थान असलेल्या बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीत भाविकांची गर्दी होत आहे. सध्या दररोज जवळपास पाच हजार भाविक बल्लाळेश्वराचे दर्शन घेत आहेत. त्यामुळे हॉटेल, दुकानदारांचा व्यवसाय तेजीत आहे. भाविकांच्या गाड्यांमुळे पालीत वाहतूककोंडी होत आहे. परंतु पाली पोलीस व देवस्थानचे सुरक्षा रक्षक वाहतूककोंडी सोडविण्यासाठी प्रयत्नशील असतात तरी अरुंद रस्त्यांमुळे परिस्थिती जैसे थे होते.मंदिर परिसरातील दुकाने व हॉटेल ग्राहकांनी गजबजले असून यात्रेचे स्वरूप आले आहे. परिसरातील हॉटेल, खेळण्यांची व शोभिवंत वस्तूंची आणि खाऊची दुकाने, नारळ, हार , फुले व पापड मिरगुंड विक्रं ते, सरबतवाले, प्रसाद व पेढेवाले आदींचा व्यवसाय चांगला होत आहे. अनेक भाविक स्वत:ची वाहने घेवून येतात, यामुळे पालीमध्ये वाहतूककोंडी होत आहे.वाहतूककोंडी सुटता सुटेनाअरु ंद रस्ते, नो एन्ट्रीमधून जाणारी वाहने, मोठ्या वाहनांची रेलचेल, वाहतुकीचे नियम मोडणारे वाहनचालक आदी कारणांमुळे पालीत वारंवार वाहतूककोंडी होते. सुट्यांमुळे मोठ्या प्रमाणात गाड्या व बसेस पालीत दाखल होत आहे. अरु ंद रस्त्यांमुळे दोन्ही बाजूने आलेल्या वाहनांना जाण्यासाठी जागा मिळत नाही. परिणामी वाहने अडकून पडून वाहतूककोंडी होते. अशा वेळी पोलिसांचे प्रयत्न असफल ठरतात. या वाहतूककोंडीचा त्रास पादचाऱ्यांना सुद्धा होतो. मंदिर परिसरात देखील अवैधरीत्या पार्क केलेल्या वाहनांमुळे वाहतूककोंडी होते. त्यामुळे भाविकांची गैरसोय होते.मंदिरासमोरील तलावाचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. रंगीत कारंजे लावण्यात आले आहेत. बल्लाळेश्वर ट्रस्टच्या वतीने भाविकांच्या सोयीसाठी शुद्ध थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. भाविकांना राहण्यासाठी दोन सुसज्ज भक्त निवास आहेत. रांगेत उभे राहण्यासाठी रेलिंग व शेड उभारण्यात आले आहे. देवस्थानचे दोन पार्किंग देखील आहे.- अ‍ॅड. धनंजय धारप, अध्यक्ष, बल्लाळेश्वर देवस्थान ट्रस्ट, पाली

टॅग्स :Raigadरायगड