शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

शौचालयांच्या कामात भ्रष्टाचार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2018 01:01 IST

तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायतीमधील शौचालयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. यातील गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात ज्या ग्रामसेवकावर आक्षेप घेण्यात आला

अलिबाग : तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायतीमधील शौचालयांच्या कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली होती. यातील गंभीर बाब म्हणजे या प्रकरणात ज्या ग्रामसेवकावर आक्षेप घेण्यात आला आहे, त्यांच्यामार्फतच चौकशीबाबतचा अहवाल मागवण्यात आला आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेने चौकशीचा केवळ फार्स चालवल्याचे स्पष्ट होत असल्याचे बोलले जाते.आदिवासी समाजाच्या अज्ञानाचा फायदा घेऊन त्यांची आर्थिक फसवणूक करून सरकारचा निधी हडप करण्याचा प्रकार कोणी करत असेल, तर हे फार गंभीर आहे; परंतु जिल्हा परिषद प्रशासनाला झालेल्या भ्रष्टाचारावर पांघरून घालायचे असल्यानेच हे पाऊल उचलेले असल्याचा आरोप आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी केला.अलिबाग तालुक्यातील ताडवागळे ग्रामपंचायतीमध्ये या योजनेमधील लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा झालेले प्रतिलाभार्थी १२ हजार रु पये इतके अनुदान तेथील ग्रामसेवक, ठेकेदार आणि स्थानिक राजकीय कार्यकर्ते हे लाभार्थ्यांवर दबाव आणून काढून घेत आहेत. त्याबदल्यात लाभार्थ्याला फक्त तीन हजार रुपयांच्या खर्चात पूर्ण होणारी अतिशय निकृष्ट दर्जाची शौचालये बांधून देण्यात आली होती. या योजनेतील भ्रष्टाचार बाहेर काढून संबंधित ग्रामसेवक, ठेकेदार आणि स्थानिक राजकीय कार्यकर्ते यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी सावंत यांनी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली होती.ताडवागळे या आदिवासी भागातील असा एक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या अन्य भागातही अशीच परिस्थिती असल्याने मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी तातडीने निकृष्ट दर्जाच्या शौचालयांची स्वत: पाहणी करून संबंधित लाभार्थ्यांना याबाबत दोषी न धरता, लाभार्थ्यांवर दबाव आणून सदरचे काम करणाºया ठेकेदार व ग्रामसेवकाविरुद्ध कायदेशीर कारवाई करणे आवश्यक होते. मात्र, जिल्हा परिषद प्रशासनाने ज्या ग्रामसेवकाविरुद्ध तक्रार आहे, त्याच ग्रामसेवकाकडून वस्तुस्थितीदर्शक अहवाल मागविण्याचे काम केले आहे.सावंत यांच्या तक्र ारीवर अलिबाग पंचायत समितीकडून सावंत यांना पत्र प्राप्त झाले आहे. त्यानुसार सदरचा प्रकार उघडकीस आला आहे. आरोप असलेल्याकडूनच अहवाल मागविण्यात आला आहे. आता नागरिकांनी तक्र ारी कोणाकडे करायच्या, असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. अलिबाग पंचायत समितीच्या कार्यक्षेत्रात फक्त १५ कि.मी. अंतरावर असलेल्या गावात जिल्हा परिषदेचे सीईओ किंवा गटविकास अधिकारी प्रत्यक्ष पाहणी करायला जात नसतील, तर त्यांना स्वच्छ भारत अभियानामधील भ्रष्टाचाराबाबत काहीच पडले नसल्याचे दिसून येते.फसवणूक करून निधी हडप१कोणत्याही लाभार्थीला स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधण्यासाठी शासनाकडून १२ हजार रु पयांचे अनुदान प्राप्त होते. यातील नऊ हजार रु पये केंद्र, तर तीन हजार रुपये राज्य शासनाचा वाटा असतो. या १२ हजार रु पयांपैकी लाभार्थ्यांना फक्त तीन हजार रु पये खर्चाचे शौचालय बांधून लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक झाली आहे.२दरम्यान, याबाबत जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. या प्रकरणी गटविकास अधिकारी यांच्याकडून मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी अहवाल मागितला असल्याचे पाणी व स्वच्छता विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पुंडलिक साळुंखे यांनी सांगितले.