शहरं
Join us  
Trending Stories
1
गिल है की मानता नहीं...; 'द्विशतकी' खेळीनंतर 'शतकी' डाव, इंग्लंडवर आणखी एक 'घाव'
2
12 देशांवर पडणार डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफचा हातोडा, स्वाक्षरीही झाली! म्हणाले...
3
ENG vs IND :आता यजमान इंग्लंडची खैर नाही! टीम इंडियानं 'बॅझबॉल'वाल्यांसमोर सेट केलं मोठं टार्गेट
4
"भाजपची दुसऱ्यांदा माघार, केंद्राकडे राज यांच्या प्रश्नांची उत्तरे नाहीत"; स्टॅलिन यांचा ठाकरेंना पाठिंबा
5
VIDEO: प्रचंड गर्दी तरीही वारकऱ्यांनी दाखवली शिस्त! रुग्णवाहिकेसाठी क्षणात मोकळी करून दिली वाट
6
Neeraj Chopra Wins Gold NC Classic 2025: घरच्या मैदानातील पहिली स्पर्धा! 'गोल्ड'सह इथंही नीरज चोप्राची हवा
7
"त्यासाठी मनगटात जोर लागतो, नुसत्या तोंडाच्या वाफा..."; एकनाथ शिंदे यांचा राज-उद्धव मेळाव्याला टोला
8
Video: "डाव घोषित करतोस का? उद्या पाऊस पडणार आहे"; हॅरी ब्रुकच्या प्रश्नाला गिलचे मजेशीर उत्तर
9
"मुंबईला नवा चेहरा दिल्याने उद्धव ठाकरेंचा जळफळाट"; CM फडणवीस म्हणाले, "एकमेकांशी भांडूनच ते…"
10
"ठाकरे ब्रँड असता, तर बाळासाहेब असतानाच २८८ आमदार असते"; शिंदेंच्या आमदाराचे धक्कादायक विधान
11
सर्वात जलद सेंच्युरी! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास; मोडला पाक फलंदाजाचा रेकॉर्ड
12
Photo: आजच दुकान गाठलं पाहिजे, बजाजची नवीन स्पोर्ट्स बाईक पाहून तुम्हीही हेच म्हणाल!
13
Viral Video: रेल्वे स्टेशन आहे की हायवे? प्लॅटफॉर्मवरून गाड्यांना धावताना पाहून प्रवाशी शॉक!
14
PHOTOS: जसप्रीत बुमराहच्या बाजूला बसून हळूच हसणारी 'ती' तरूणी कोण? जाणून घ्या तिच्याबद्दल...
15
COVID19: महाराष्ट्रावरचं कोरोना संकट आणखी गडद, आज १२ नव्या रुणांची नोंद, २४ तासात एकाचा मृत्यू
16
उद्धव-राज ठाकरेंसंदर्भात रामदास आठवले यांची मोठी भाविष्यवाणी, म्हणाले, 'आमच्या महायुतीला...!'
17
जयजयकार...मराठी शक्तीचा, 'ठाकरे ब्रँड'वरील भक्तीचा! उद्धव-राज एकत्र येतात तेव्हा...
18
आशा आहे, मी आणखी 30-40 वर्षे जगेन आणि...; दलाई लामांकडून उत्तराधिकारी वादाला पूर्णविराम
19
"डोळे आणि मन आज तृप्त झालं...", ठाकरे बंधू एकत्र, मराठी अभिनेत्याचा आनंद गगनात मावेना
20
"हिंदी सक्ती मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याआधीची चाचपणी होती"; राज ठाकरे यांचा गंभीर आरोप

जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाला आला कॉर्पाेरेट लूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2019 01:58 IST

दोन टेबलांच्या मधून एकच व्यक्ती जाईल, अशी गर्दीची जागा, फायलींचा साठलेला ढीग, डोक्यावर खडखड वाजणारा पंखा, असे सरकारी कार्यालयाचे चित्र आपण नेहमीच बघत आलो आहोत;

आविष्कार देसाईअलिबाग : नेहमीच अंधारलेल्या खोल्या, दोन टेबलांच्या मधून एकच व्यक्ती जाईल, अशी गर्दीची जागा, फायलींचा साठलेला ढीग, डोक्यावर खडखड वाजणारा पंखा, असे सरकारी कार्यालयाचे चित्र आपण नेहमीच बघत आलो आहोत; परंतु रायगड जिल्हा परिषद अशा गोष्टींना अपवाद ठरत असल्याचे दिसते. तब्बल ७० लाख रुपये खर्च करून जिल्हा परिषदेच्या अर्थ विभागाचे मेकओव्हर होत आहे. नव्याने मिळणाऱ्या कॉर्पाेरेट लूकमुळे आता अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढण्याला बळ मिळणार असल्याचे बोलले जाते.रायगड जिल्हा परिषदेच्या इमारतीला तब्बल ३० वर्षे उलटून गेली आहेत. आजही शिवतीर्थ नावाची ही देखणी वास्तू राज्याचे लक्ष वेधत आहे. शेकापचे तत्कालीन अध्यक्ष प्रभाकर पाटील यांनी या वास्तूची उभारणी केली आहे. शिवरायांनी रयतेचे राज्य याच रायगडातून चालवले होते. त्यानुसारच जिल्ह्यातील ग्रामीण भागातील राज्यकारभार चालावा. या हेतूने प्रेरीत होऊनच प्रभाकर पाटील यांनी या इमारतीला शिवतीर्थ असे नाव दिले आहे. शिवतीर्थ इमारतीमध्ये महिला व बालकल्याण, समाजकल्याण, अर्थ विभाग, ग्रामपंचायत, ग्रामीण पाणीपुरवठा, सामान्य प्रशासन, आरोग्य विभाग, पाणी व स्वच्छता यासह अन्य विभाग आहेत. त्याचप्रमाणे तीन सभागृह, विविध खात्याचे प्रमुख, सभापती यांच्यासाठी स्वतंत्र कार्यालये आहेत. नव्याने निवडून येणारे सदस्य आणि अधिकारी आपापल्या आवडीनुसार दालनाची सजावट करत आले आहेत; परंतु कर्मचाºयांना आता चांगल्या जागेत बसून काम करता येणार आहे.अर्थ विभागातील कार्यालयाची रचना कालबाह्य झाली होती. त्यामुळे अर्थ विभागाचे प्रमुख दत्तात्रेय पाथरुट यांनी मेकओव्हर करण्याचा निर्णय घेतला. सत्ताधारी पक्षाचे प्रभारी उपाध्यक्ष आस्वाद पाटील यांनी त्यांना तातडीने मान्यता दिली. त्यानुसार आता अर्थ विभागातील कार्यालयाची रचना बदलण्यात आली आहे. बसण्यासाठी अतिशय सुटसुटीत जागा, चांगल्या दर्जाची बैठक व्यवस्था टेबल, खुर्ची, लख्ख प्रकाश, वातानुकूलित यंत्रणा, प्रत्येकाला स्वतंत्र शेल्फ, ड्रॉव्हर अशी व्यवस्था करण्यात येत आहे. अर्थ विभागामध्ये एकत्रित मिळून ४० कर्मचारी आहेत. त्याचप्रमाणे कॅशिअर, अकाउंट आॅफिसर, मुख्य लेखाधिकारी, सहायक लेखाधिकारी यांचे स्वंतत्र दालन उभारण्यात आले आहे.>उत्कृष्ट पद्धतीने सर्व अंतर्गत रचना निर्माण करण्यात आल्याने अर्थ विभागाच्या कार्यालयाला आता कॉर्पाेरेट कंपन्यांच्या कार्यालयासरखा लूक आला आहे. त्यामुळे आता काम करताना थकवा जाणवणार नाही, तसेच वातावरण प्रसन्न राहण्यास मदत होऊन कर्मचाºयांची कार्यक्षमता वाढेल, असा विश्वास अर्थ विभागाचे प्रमुख दत्तात्रेय पाथरुट यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केला.>सुमारे ७० लाख रुपये यावर खर्च करण्यात आले आहेत. लवकरच या नवीन कार्यालयाचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे प्रभारी अध्यक्ष आस्वाद पाटील यांच्या हस्ते होणार असल्याचेही पाथरुट यांनी सांगितले. अंतर्गत रचना बदलण्यासाठी वापरण्यात आलेले सर्व साहित्य चांगल्या दर्जाचे आहे. त्यामुळे वाळवी, आग यापासून पुढील १५ ते २० वर्षे संरक्षण होणार असल्याकडेही त्यांनी लक्ष वेधले. लवकरच अन्य विभागातील कार्यालयांचा मेकओव्हर करण्याचा मानस असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.