शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
5
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
6
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
7
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
8
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
9
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
10
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
11
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
12
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
13
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
14
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
15
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
16
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
17
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
18
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
19
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
20
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Coronavirus : शाळा बंद, खासगी शिकवण्या सुरूच, सरकारी आदेशाचे उल्लंघन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2020 02:27 IST

सध्या शाळांमध्ये शुकशुकाट आहे. परंतु खासगी शिकवण्या मात्र सुरू आहेत. या शिकवण्यांकडून सरकारी आदेशाची पायमल्ली होत असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

कळंबोली : रायगड जिल्ह्यातील सर्व नगरपालिका आणि महापालिका क्षेत्रातील शाळांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे सध्या शाळांमध्ये शुकशुकाट आहे. परंतु खासगी शिकवण्या मात्र सुरू आहेत. या शिकवण्यांकडून सरकारी आदेशाची पायमल्ली होत असून त्यांच्यावर कठोर कारवाईची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.पनवेल परिसरात खासगी शिकवण्या, कोचिंग क्लासची संख्या मोठी आहे. या ठिकाणी लाखो रुपये शुल्क आकारून विद्यार्थ्यांना कोचिंग दिले जाते. झपाट्याने पसरणाऱ्या कोरोनापासून बचावासाठी केंद्र आणि राज्य सरकारने खबरदारीच्या अनेक उपाययोजना हाती घेतल्या आहेत. त्यानुसार महापालिका, नगरपालिका क्षेत्रातील शाळांना सुट्टी जाहीर केली आहे.त्यामध्ये खासगी शाळांचाही समावेश आहे. त्यानुसार सोमवारपासून सर्व शाळांमधील किलबिलाट बंद झाला. मात्र पनवेल परिसरातील खासगी शिकवण्या, कोचिंग क्लास सुरू असल्याचे दिसून येत आहे. अनेक क्लासेसमध्ये शेकडो विद्यार्थी एका ठिकाणी बसतात. त्यामुळे कोरोनाचा प्रसार होण्याचा धोका निर्माण झाला आहे. मात्र केवळ प्रतिष्ठेसाठी विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू असल्याचे दिसून येत आहे. यावरून खासगी कोचिंगवर कोणाचे नियंत्रण नसल्याचेही दिसून येत आहे. या शिकवण्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी एकता सामाजिक सेवा संस्थेचे अध्यक्ष अमोल शितोळे यांनी केली आहे. याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र देणार असल्याचे नगरसेवक सतीश पाटील यांनी सांगितले.पनवेल महापालिका क्षेत्रातील सर्व शासकीय आणि खासगी शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. त्या आशयाचे पत्रक आयुक्तांनी जारी केले आहे. खासगी क्लासेस सुरू असल्याच्या तक्रारी येत आहेत. त्यांच्यावर नक्कीच कारवाई करण्यात येईल. परंतु पालकांनीसुद्धा पाल्यांना अशा प्रकारे खासगी क्लासेसमध्ये पाठवणे टाळले पाहिजे, असे आवाहन मनपाकडून करीत आहोत.- जमीर लेंगरेकर,उपायुक्त, पनवेल मनपाराष्ट्रीय आपत्ती घोषित झाल्यानंतरही शिक्षणाचा बाजार मांडलेल्या लोकांनी पैशासाठी खासगी शिकवण्या चालू ठेवल्या आहेत. सामाजिक बांधिलकी ठेवून खासगी शिकवण्या बंद करणे आवश्यक आहे.- अ‍ॅड. श्रीनिवास क्षीरसागर,कायदेतज्ज्ञ, नवी मुंबई

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसcorona virusकोरोना