शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
2
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
3
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
4
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
5
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
6
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
7
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
8
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
9
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
10
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
11
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
12
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
13
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
14
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
15
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
16
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
17
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
18
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
19
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
20
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: रायगडमधील पनवेल महापालिका क्षेत्र ‘रेड झोन’मध्ये; रुग्ण वाढल्याने प्रशासनाचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 3, 2020 01:02 IST

लॉकडाउन शिथिल नाही; कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजनांवर आणखी भर

वैभव गायकरपनवेल : सध्याच्या घडीला केंद्र सरकारने जिल्हानिहाय झोन तयार केले आहेत. यामधील रेड झोनमधील जिल्ह्यात निर्बंध कायम राहणार आहेत. पनवेल तालुका हा रायगड जिल्ह्यात येतो. रायगड जिल्हा आॅरेंज झोनमध्ये आहे. मात्र, पनवेलमधील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता महापालिका क्षेत्रात रेड झोनची नियमावली कायम राहणार आहे.

पनवेल महापालिका क्षेत्रात रुग्णांचा आकडा ९० पर्यंत पोहोचला आहे. यामध्ये ग्रामीण भागातील १२ जणांचा सहभाग असल्याने पनवेल तालुक्यात बाधितांचा आकडा १०० पेक्षा जात असल्याने पनवेलमध्ये रेड झोनचे निर्बंध असणार असल्याची माहिती पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी दिली. विशेष म्हणजे, सध्याच्या घडीला पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणात संभ्रम निर्माण झाला आहे. पनवेल तालुका रायगड जिल्ह्यात येत असल्याने रायगड जिल्हाचा सहभाग आॅरेंज झोनमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे पनवेलमधील निर्बंध शिथिल होणार असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.

पनवेल पालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेता यापूर्वीच पोलीस प्रशासनाने सर्वच चोख बंदोबस्त ठेवला आहे. पनवेलमध्ये खारघर, नवीन पनवेल, कामोठे शहरात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. जिल्ह्यातील उर्वरित तालुक्यांच्या तुलनेत एकट्या पनवेलमध्ये ९० टक्के कोविड १९ चे रुग्ण आढळल्याने पनवेलकरांसाठी रेड झोनचे निर्बंध कायम असणार आहेत. आजच्या घडीला शेकडो नागरिकांचे कोविडचे नमुने अहवालाच्या प्रतीक्षेत आहेत. याकरिता प्रशासनाने सतर्कता म्हणून रेड झोनचे निर्बंध कायम ठेवले आहेत.

पनवेल परिसरात मोठ्या संख्येने नागरिकांना होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. हा आकडा सुमारे १५०० पेक्षा जास्त आहे. संबंधित नागरिकांच्या १४ दिवसांच्या होम क्वारंटाइन कालावधी २८ दिवस करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने केला आहे. त्यामुळे पनवेल परिसरात नागरिकांना अद्यापपर्यंत कोणत्याही प्रकारची सूट नसून नागरिकांनी अनावश्यक कामासाठी बाहेर पडू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.पनवेल परिसरात कोविडच्या रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने याठिकाणी रेड झोनचे निर्बंध गरजेचे आहेत. पनवेल परिसरात रेड झोनचे निर्बंध कायम असणार आहेत. पोलीस आयुक्तांशीदेखील यासंदर्भात सविस्तर चर्चा करणार आहे. - गणेश देशमुख, आयुक्त, पनवेल महापालिकारेड झोनमधील नियमावली : जीवनावश्यक वस्तू व औषध वाहतुकीला परवानगी, आॅटो रिक्षा, खासगी टॅक्सीसह ओला-उबेरला परवानगी नाही. पास असलेल्या खासगी वाहनातून दोघांना परवानगी, दुचाकीवर एकास परवानगी, विशेष आर्थिक क्षेत्रातील उद्योग, वैद्यकीय उपकरणे, औषध निर्माण व ई-कॉमर्सवरून जीवनावश्यक वस्तू तसेच खासगी कार्यालयात ३३ टक्के कर्मचाऱ्यांना परवानगी.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या