शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही जगावं की मरावं? ठाकरे सरकारनं आत्महत्येची परवानगी द्यावी’

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 6, 2021 00:09 IST

नाभिक समाजाकडून ठाकरे सरकारच्या निर्णयाचा निषेध

तळा : कोरोना विषाणूला रोखण्यासाठी महाराष्ट्र शासनाने रविवारी राज्यात कठोर निर्बंध लागू केले. ज्यामध्ये राज्यातील सर्व सलून ३० एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. या आदेशाचा तळा तालुका नाभिक समाजाकडून निषेध व्यक्त करण्यात आला.मुख्यमंत्र्यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी मिनी लॉकडाऊनची घोषणा केली. यामध्ये त्यांनी प्रामुख्याने सलून व्यवसायावर पूर्णतः बंदी आणली. गेल्या वर्षभर आधीच सलून व्यवसायाचे व कारागिरांच्या आर्थिक व्यवस्थेचे कंबरडे मोडले असताना पुन्हा पूर्ण एक महिना सलून बंद ठेवण्याचा आदेश महाराष्ट्र शासनाने दिल्याने जगाव की मरावं ? असा प्रश्न सलून व्यावसायिकांना पडला आहे.सलून करागीर हा रोजंदारी वर्गातील कामगार आहे, म्हणजेच आज काही कमवू तेव्हा कुठे आज खायला मिळेल, मग जर महिनाभर सलून बंद ठेवले तर या कारागिरांनी आणि त्यांच्या कुटुंबीयांनी खायचं काय? नाभिक समाजातील हे कारागीर आणि त्यांचं कुटुंब रस्त्यावर भीक मागायला यावं असं या सरकारला वाटत का? की या कारागिराने याला कंटाळून आत्महत्या करावी अस वाटतंय?आमचं सरकारच्या निर्णयाला विरोध नाही, परंतु सलून पूर्णतः बंद करण्यापेक्षा आम्हाला काही नियम व अटींवर परवानगी द्यावी जेणेकरून आम्हीही आमचं प्रपंच चालवू शकतो. तसे नसेल तर आमचे दुकानाचे भाडे, वीजबिल, घराचे भाडे या कालावधीसाठी पूर्णतः माफ करावे व दिवसाला १०० रुपये याप्रमाणे कमीतकमी महिना ३००० रुपये कुटुंबाचे पोट भरण्यासाठी सरकारने द्यावे, मग आम्हीही याला पाठिंबा देऊ आणि यातील काहीही जमत नसेल तर आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी विनंती रायगड जिल्हा नाभिक तरुण संघ युवा अध्यक्ष समीर शिर्के यांनी केले आहे. याप्रसंगी नाभिक समाजाचे नागरिक उपस्थित होते. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या