शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
5
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
6
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
7
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
8
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
9
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
10
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
11
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
12
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
13
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
14
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
15
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
16
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
17
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
18
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
19
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
20
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News in Raigad : रायगड जिल्ह्यात उभारले १२ स्वॅब टेस्टिंग बूथ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 06:24 IST

रायगड जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या आधी आणि नंतर मोठ्या संख्येने नागरिकांचे लोंढे सरकत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे.

अलिबाग : रायगड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. या ठिकाणच्या नागरिकांची तातडीने कोरोना टेस्ट होणे गरजे आहे. त्याचप्रमाणे पीपीई किटचा वाढता खर्च रोखण्यासाठी तब्बल १२ स्वॅब टेस्टिंग बूथची निर्मिती करण्यात आली आहे, अशी माहिती पालकमंत्री आदिती तटकरे यांनी दिली.रायगड जिल्ह्यामध्ये चौथ्या टप्प्यातील लॉकडाउनच्या आधी आणि नंतर मोठ्या संख्येने नागरिकांचे लोंढे सरकत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने मुंबई आणि ठाणे जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. रेड झोनमधून येणाऱ्या नागरिकांमुळे जिल्ह्यात कोरोनाचा धोका वाढला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये यासाठी खबरदारी घेण्यात येत आहे. परंतु कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. समाजामध्ये कोरोना पॉझिटिव्ह असणाऱ्यांची स्वॅब टेस्ट होणे गरजेचे आहे. या पार्श्वभूमीवर अनेक नागरिकांची तपासणी करणे आवश्यक आहे. पीपीई किटची संख्या मर्यादित असल्यामुळे तपासणी करण्याबाबत मर्यादा आहेत. सध्या वाढत जाणाºया संशयित कोरोनाबाधित रुग्णांची स्वॅब सॅम्पल तपासणी जलद गतीने होण्यासाठी कोविड-१९ स्वॅब सॅम्पल कलेक्शन बूथ हे उपकरण रायगड जिल्ह्यात कार्यान्वित करण्यास सुरुवात करण्यात आली.कोरोनाबाधित रुग्णांची तपासणी करताना डॉक्टर, नर्स वा तंत्रज्ञ यांचा रुग्णाशी खूप जवळून संपर्क येतो आणि त्यातून त्यांना संसर्ग होण्याची शक्यता असते. या स्वॅब टेस्टिंग बूथमुळे तपासणी करणाºया तंत्रज्ञ आणि रुग्णामध्ये सुरक्षित अंतर राहील. त्यामुळे रुग्णाच्या शिंकण्याचा किंवा खोकण्याचा थेट परिणाम होणार नाही, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.नवीन तंत्रज्ञानावर आधारित एकूण १० स्वॅब टेस्टिंग क्यूबरायगड जिल्ह्यात एकूण १२ ठिकाणी हे बूथ बसविण्यात आले आहेत. या विषाणूची लागण तपासणी करणाºयांना होऊ नये याकरिता जिल्ह्यात नवीन तंत्रज्ञानावर आधारित एकूण १० स्वॅब सॅम्पल तपासणी बूथ (स्वॅब टेस्टिंग क्यूब) देण्यात आले आहेत. महाड तालुक्यासाठी दोन, माणगावसाठी एक, तळासाठी एक, पोलादपूरसाठी एक तसेच रोह्यासाठी दोन, श्रीवर्धनसाठी एक, म्हसळासाठी एक तर पालीसाठी एक असे एकूण दहा स्वॅब टेस्टिंग क्यूब दिले आहेत. त्याचप्रमाणे उरण येथील केअर पॉइंट हॉस्पिटल, उरण व कर्जत येथील उपजिल्हा रुग्णालय येथे दोन स्वॅब टेस्टिंग क्यूब दिले आहेत. याद्वारे पीपीई किटचा खर्च वाचेलच, पण त्यासह जादा संशयित रुग्णांची तपासणीही होऊ शकेल. यामुळे सॅम्पल कलेक्शन करता येऊ शकेल, असेही पालकमंत्री आदिती तटकरे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसRaigadरायगड