शहरं
Join us  
Trending Stories
1
नोकरी शोधणाऱ्यांसाठी खुशखबर ! 'या' सरकारी संस्थांमध्ये १०० टक्के पदभरतीस मान्यता
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी मित्र राष्ट्रांवर टाकला टॅरिफ बॉम्ब; जपान आणि दक्षिण कोरियातल्या वस्तूंवर २५ टक्के कर
3
Video: मान गए माही... MS Dhoni ने क्रिकेट संघटनेच्या कर्मचाऱ्यांसोबत साजरा केला वाढदिवस
4
एकाच कुटुंबातील ५ जणांना जिवंत जाळलं; संपूर्ण गाव शांत पण मुलाने सगळं समोर आणलं
5
"चालक नसल्याने नवीन बससेवा सुरु करता येणार नाही"; परिवहन विभागाच्या पत्रावर राजू शेट्टींचा संताप
6
CCTV: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून पडले विद्यार्थी; चालकाला पत्ताच नाही, रिक्षावाल्यामुळे वाचले
7
भारतीयांचा जगात डंका ! ICCच्या CEO पदी संजोग गुप्ता यांची निवड, ठरले केवळ दुसरे भारतीय
8
OYO हॉटेलमध्ये एका तासासाठी खोली कशासाठी दिली जाते? सरकारने माहिती घेण्याची मुनगंटीवारांची मागणी
9
"डार्लिंग, काम झालं..."; माय-लेकींचं अफेअर, बॉयफ्रेंडसाठी वडिलांचा काढला काटा, झाला पर्दाफाश
10
पुतिन यांनी काही तासांपूर्वीच मंत्र्याची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केली; आता सापडला मृतदेह
11
Video: "लाज वाटू द्या, गिधाडांनो"; प्रिया फुकेंच्या हातून कागद हिसकावले, रोहिणी खडसेंचा संताप
12
या फ्रँचायझीने दिले जास्त पैसे; लखनौ सुपर जायंट्सचा दिग्वेश राठी आता या संघातून खेळणार
13
“सत्ता हे भाजपाचे ध्येय नव्हते, ठाकरे बंधू एकत्र आल्याचा काही परिणाम नाही”: सुधीर मुनगंटीवार
14
"आयुष्यात कधीही कोणावर प्रेम करू नका..."; इन्स्टावर लाईव्ह येत तरुणाने संपवलं जीवन
15
“वाद निर्माण करायला निशिकांत दुबेंचे विधान, हिंदी सक्तीचा फतवा रेशिमबागेतून”; काँग्रेसची टीका
16
उपमुख्यमंत्री अजित पवारांचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना पत्र; केली मोठी मागणी, म्हणाले...
17
चेटकीण असल्याच्या संशय; एकाच कुटुंबातील पाच जणांना जाळून मारले, संपूर्ण गावावर आरोप....
18
"प्राथमिक शिक्षण मातृभाषेतच घ्यायला हवं"; हिंदी वादावर आरएसएसची स्पष्ट भूमिका
19
Video - रीलचा नाद लय बेक्कार! ट्रॅकवर झोपला १२ वर्षांचा मुलगा, समोरून आली ट्रेन अन्...
20
फक्त फोटो काढायला आलीस का? महिलेच्या संतापानंतर कंगना म्हणाली, "मला मदत निधी मिळत नाही"

CoronaVirus News : रायगड जिल्ह्यात कोरोनामुळे आतापर्यंत एक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 14, 2020 23:51 IST

संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसाला कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण सापडून येत आहेत. जिल्हाबंदी उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे.

- मयूर तांबडेनवीन पनवेल : कोरोनामुळे रायगड जिल्ह्यात आतापर्यंतएक हजाराहून अधिक जणांचा मृत्यू झालेला आहे. यात सर्वाधिक मृत्यू पनवेल महानगरपालिका हद्दीत झालेले असून, त्याचा आकडा ३४४ आहे, तर पनवेल ग्रामीणमध्ये ८६ आणि खालापूरमध्ये ८८ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झालेला आहे. सर्वाधिक कमी प्रमाणात मृत्यू तळा येथे ६ आणि म्हसळा येथे १० जणांचा झालेला आहे.संपूर्ण रायगड जिल्ह्यात दिवसाला कोरोनाचे ७०० हून अधिक रुग्ण सापडून येत आहेत. जिल्हाबंदी उठवण्यात आल्याने सर्व व्यवहार सुरू झाले आहेत, त्यामुळे मोठ्या प्रमाणात नागरिकांची गर्दी होताना दिसून येत आहे. दररोजच्या वाढत्या लोकसंख्येमुळे कोरोना सेंटरमध्ये रुग्णांची संख्या वाढू लागली आहे, तर काही ठिकाणी रुग्ण घरीच उपचार घेताना दिसून येत आहेत.ज्यांना श्वास घेण्यास त्रास होत आहे, त्यांनी रुग्णालयात उपचार घ्यायला हवे असे आवाहन केले जात आहे. कोरोनाचे संकट अजून काही महिने सुरू राहणार आहे. वाढती रुग्णसंख्या आणि व्हेंटिलेटर, आॅक्सिजन बेडची संख्या अपुरी पडत असल्याने नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे मोठ्या प्रमाणात आॅक्सिजनची मागणी वाढू लागलेली आहे. आॅक्सिजन बेड आणि आयसीयूच्या कमतरतेमुळे अनेक ठिकाणी रुग्णांची परवड होताना दिसून येत आहे. त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.सध्या कोरोना रुग्ण संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून, अनेक जण होम क्वारंटाइन होताना दिसून येत आहेत. सर्वाधिक रुग्णसंख्या वाढ पनवेल महापालिका हद्दीत होताना दिसून येत आहे. दोनशे ते अडीचशे रुग्ण रोज सापडून येत असल्याने नागरिकांच्या चिंतेत भर पडत आहे.- पनवेल परिसरात आॅक्सिजनची सुविधा असलेले बेड उपलब्ध होत नसल्याने नेमके रुग्णांनी रुग्णांना न्यावे, तरी कुठे असा प्रश्न उपस्थित होत आहे. रुग्णसंख्या वाढल्याने आॅक्सिजनची मागणी वाढली आहे. मात्र, त्या तुलनेत पुरवठा होत नसल्याने तुटवडा भासत आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस