शहरं
Join us  
Trending Stories
1
आम्हाला वाचवा...भारताच्या मित्रराष्ट्रांसमोर पाकने पसरले हात; अमेरिका-रशियाने दिले 'हे' उत्तर
2
संतोष देशमुखांच्या कन्येचे 12वीत घवघवीत यश; वैभवीने मिळवले 85.33 टक्के गुण...
3
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
4
खळबळजनक! मनाविरुद्ध लग्न होताच काढला पतीचा काटा; बॉयफ्रेंडसह ७ जणांना अटक
5
'बाजीराव मस्तानी'मध्ये दिसल्या असत्या अलका कुबल; म्हणाल्या, "भन्साळींना भेटले पण त्यांनी..."
6
HSC Exam Result 2025: १२ वी परीक्षेत १२४ केंद्रांवर गैरप्रकार; त्रुटी आढळल्यास केंद्र कायमस्वरूपी बंद करणार - शरद गोसावी
7
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
8
HI हर्षा, माझ्याशी लग्न करशील?; असलमच्या प्रपोजलला कुंभमधील व्हायरल गर्लचं बेधडक उत्तर
9
Instagram Crime News: इन्स्टाग्रामवर मैत्री, तरुणीवर अनेक वेळा बलात्कार अन् बनवले व्हिडीओ; लाखो रुपये उकळले
10
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
11
आमिर खानच्या बहुचर्चित 'सितारे जमीन पर'चं पहिलं पोस्टर आऊट, 'या' दिवशी रिलीज होणार सिनेमा
12
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
13
"लग्नानंतर ४ वर्षांनी घटस्फोट झाला आणि...", Divorce बद्दल पहिल्यांदाच बोलला स्वप्नील जोशी
14
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
15
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
16
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
17
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
18
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
19
घरातल्या कमोडमध्ये झाला मोठा धमाका, वेस्टर्न टॉयलेटचा स्फोट होऊन तरुण गंभीर जखमी!
20
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल

CoronaVirus News: समाजमन जागृत ठेवून कोरोनाशी मुकाबला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2020 00:10 IST

स्थानिक पातळीवर घेतली जातेय खबरदारी; उद्योगांची संख्या आणि महानगरचा शेजार ठरतोय धोकादायक

- आविष्कार देसाई रायगड : हा उद्योगांचा जिल्हा आहे. त्याचप्रमाणे महानगराला लागून असल्याने या ठिकाणी कोरोनाचे संकट गहिरे झाले आहे. मात्र ग्रामीण भागामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विविध उपाययोजना राबवून कोरोना विषाणूचा फैलाव होणार नाही याची खबरदारी स्थानिक पातळीवर समाजमन जागृत ठेवून घेण्यात येत आहे.उद्योगधंद्यांचे जाळे ज्या जिल्ह्यामध्ये अधिक प्रमाणात आहे तो जिल्हा आर्थिकदृष्ट्या सक्षम असे समीकरण मांडण्यात येते. मात्र उद्योग आणि महानगराचा शेजार कधीकधी घातक ठरू शकतो हे अलीकडेच कोरोना प्रादुर्भावाच्या संख्येवरून दिसून येते. मुंबई, नवी मुंबई आणि पुणे हे अगदी लगतचे जिल्हे आहेत. सुरुवातीपासूनच या जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत आला आहे. त्याचा विपरीत परिणाम हा रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्ण वाढण्यावर झाला आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यामध्ये उरण, तळोजा, खालापूर, पेण, अलिबाग, रोहा, महाड या तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कारखाने सुरू आहेत. गेल्या काही महिन्यांपासून या औद्योगिक पट्ट्यांमध्ये कोरोनाचा फैलाव वाढलेला आहे. कारखान्यांतील कामगार, अधिकारी हे कोरोनाची शिकार झाल्याने स्थानिक पातळीवरील गावांमध्ये कोरोनाने चांगलेच हातपाय पसरले आहेत.कोरोनामुळे आज माणसाने माणूसपण हरवले आहे. अशा कठीण परिस्थितीमध्ये समाजमन जागे ठेवून कोरोनाशी मुकाबला करण्याचे काम जिल्ह्यात सुरू आहे. कोरोनाचा फैलाव वेळीच रोखण्यासाठी ग्रामस्थ, ग्रामपंचायत, आरोग्य विभाग, महसूल विभाग, पोलीस यंत्रणा यांनी पावले टाकली आहेत. गावांमध्ये कोरोनाविषयी जनजागृती करण्यात येत आहे.सॅनिटायझरचा वापर, नाका-तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर ठेवणे, कोरोनाचा रुग्ण आढळल्यास त्याच्यावर तातडीने उपचार करणे, त्यांच्या नातेवाइकांना क्वारंटाइन करणे, त्याचप्रपाणे क्वारंटाइन केलेल्यांना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणे, बाहेरून येणाऱ्या नागरिकांच्या नोंदी ठेवणे, गावांमध्ये स्वच्छता ठेवणे, शारीरिक शक्ती वाढविण्यासाठी औषधांचे वाटप करणे असे विविध उपाय करण्यात येत आहेत. गावकऱ्यांना गावाबाहेर जायचे असेल तर ते मास्क आणि सॅनिटायझर घेऊनच बाहेर पडत आहेत.नेमके काय केले?कोरोनाला रोखण्यासाठी गावांमध्ये सॅनिटायझर आणि मास्कचा वापर करणे बंधनकारक केले आहे.दुकानामध्ये अथवा बोलताना सामाजिक अंतर राखण्यात येत आहे. नागरिक हि याबाबत सजग झाले आहेत.गावात नव्याने येणाºयांची नोंद ठेवून त्यांना क्वारंटाइन करण्यात येत आहे. नियम पाळले जात आहेत.क्वारंटाइन करण्यासाठी समाज मंदिर, शाळेच्या इमारतींत राहण्याची व्यवस्था करणे.क्वारंटाइन कालावधीमध्ये कोणी बाहेर पडणार नाही याची काळजी घेणे, जेवणाची औषधांची व्यवस्था करणे.क्वारंटाइन केलेल्यांच्या घरातील वयोवृद्ध, लहान मुले, महिला, गरोदर माता यांची काळजी घेणे.गावामध्ये सण, उत्सव साजरे न करण्यासाठी दवंडी देण्यात येत आहे.नागरिकांच्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढावी यासाठी आयुर्वेदिक औषधांचे वाटप करणे.प्रशासनाकडून कोरोनाबाबत येणाºया सूचना, आदेशांचे काटेकोर पालन के ले जात आहे.कोरोनामुळे समाजातील नागरिकांचे तंटे होऊ नयेत याची योग्य खबरदारी घेतली जात आहे.अडीच लाख नागरिक परतलेसध्या शेतीचा हंगाम सुरू असल्याने बी-बियाणे, अवजारे यांची खरेदी करताना दुकानाबाहेर सोशल डिस्टन्सिंग पाळले जात आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत जिल्ह्यात सुमारे अडीच लाख नागरिक आले होते. मुंबई-पुणे येथे काम-धंद्यानिमित्त हे नागरिक तेथे राहतात.कोरोना रोखण्यासाठी जनजागृतीकोरोनाला रोखण्यासाठी ग्रामीण पातळीवर जनजागृती के ली जातआहे. कोरोना रुग्णांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज आहे, कोविड केअर सेंटर उभारण्यात आले आहे. सरकारकडून आलेले निर्देश, सूचना यांची अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात येत आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग, स्क्रीनिंग करण्यात येत आहे.- किरण पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगडभीती दूर के लीस्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यात आले. सॅनिटायझर, मास्कचा वापर, कोरोनाबाबतचे समज-गैरसमज याबाबत जनजागृती करून नागरिकांच्या मनातील भीती दूर केली. कोरोनासाठी विशेष कक्ष स्थापन केला आहे.- सरिता भगत, सरपंच, वाडगावस्वच्छतेवर दिला भरकोरोनाला रोखण्यासाठी स्वच्छता अत्यंत महत्त्वाची आहे. सामाजिक अंतर राखणे यावर भर दिला. बाहेरून येणाºयांची तपासणी करण्यात येते. सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक केले आहे.- संजय पाटील, सरपंच, बेलकडेग्रामस्थांचे सहकार्यग्रामपंचायत हद्दीतील लोकांना मास्क लावण्यास सांगून कोणताही कार्यक्रम करताना सोशल डिस्टन्सिंग पाळण्याच्या सूचना देतो. माझे सर्व सहकारी व ग्रामस्थ मला सहकार्य करतात.- सुरेश फराट, सरपंच, वरई तर्फे निड ग्रुप ग्रामपंचायत-कर्जतनिर्जंतुकीकरणावर भर गावामध्ये निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मास्क, सॅनिटायझरचा वापर करण्याबाबत गावातून फलक लावले. चौकातून दवंडी देण्यात आली.- चंद्रकांत चाळके, सरपंच, शिस्तेमास्कची सक्तीबोर्लीपंचतन ग्रामपंचायत हद्दीत कॉर्नर बैठका, दवंडी आणि फलक लावून नागरिकांत जनजागृती करण्यात आली. मास्क वापरावर सक्ती करून, नागरिकांना सामाजिक अंतराचे भान ठेवण्यास सांगत आहोत.- उत्तम दिवेकर, उपसरपंचप्राथमिक आरोग्य केंद्राची भूमिकाकोरोनाची दहशत प्रचंड असल्याने खासगी डॉक्टर रुग्णांची तपासणी करण्यास नकार देत होते. त्या वेळी प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर, नर्स, आरोग्य कर्मचारी हे रुग्णांच्या सेवेसाठी २४ तास उभे होते. एखादा कोरोना रुग्ण आढळलाच तर त्याच्यावर उपचार करण्यात येतात.अंगणवाडी ताई, आशा वर्कर्सचा रोलग्रामीण भागामध्ये खºया अर्थाने सुदृढ आरोग्याची जबाबदारी ही अंगणवाडी ताई आणि आशा वर्कर्स यांच्यावरच आहे. घरोघरी जाऊन रुग्णांचा शोध घेणे, औषधांचे वाटप करणे ही कामे करतानाच, शालेय पोषण आहाराचे वाटप करणे, गरोदर मातांचे संगोपन करणे अशी कामेही करत आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या