शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: जिल्हा रुग्णालयाला मिळाले २० आयसीयू बेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2020 23:48 IST

CoronaVirus Raigad News: आदिती तटकरे यांच्या हस्ते उद्घाटन; ९७ बेड्सपैकी ५३ बेड्समध्ये ऑक्सिजनची व्यवस्था

अलिबाग : कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने अलिबाग येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपाययोजनांसह सोईसुविधांमध्ये वाढ करून जिल्हा रुग्णालय सशक्त करण्याचा प्रयत्न जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. रुग्णालयात अद्ययावत केलेल्या २० आयसीयू, आॅक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे उद्घाटन रविवारी पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले.कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेत, जिल्ह्यात रुग्णांची वाढत चाललेली संख्या चिंतित करणारी होती. जिल्हा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना उत्तम उपचार मिळण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून विशेष प्रयत्न केले जात होते. त्या प्रयत्नांना आता यश आले आहे.हेक्झावरे या कंपनीने सीएसआर फंडातून ९७ आॅक्सिजन बेड उपलब्ध करून देत आहे. यापैकी आयसीयूमधील आक्सिजन व व्हेंटिलेटर बेडचे काम पूर्णत्वास आले आहे. या विभागात पत्रकार, महसूल आणि पोलीस विभागासाठी १ बेड राखीव ठेवण्यात आले आहेत. कोरोनाची अति तीव्र लक्षणे असणाºया रुग्णांना आक्सिजनची अवश्यकता भासत असल्याची माहिती मुंबई येथील हेक्झावरे कंपनीला मिळाली. त्यानुसार, या कंपनीने जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्याशी संपर्क साधत मदतीचा हात पुढे केला.या कंपनीने जिल्हा रुग्णालयाची तत्काळ पहाणी करून आपल्या सीएसआर फंडातून जिल्हा रुग्णालयातील आॅक्सिजन पॅनल तयार केले, तसेच ९७ बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये ४४ बेड आयसीयू बेड असणार आहेत, तर ५३ बेड हे आॅक्सिजन व्यवस्थेने परिपूर्ण व अद्यावत असणार आहेत. त्यामुळे रूग्णांना दिलासा मिळणार आहे.यावेळी अलिबाग नगरपालिकेचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. किरण पाटील, निवासी उप जिल्हाधिकारी डॉ.पद्मश्री बैनाडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.सुहास माने, हेक्झावरे कंपनीच्या सीएसआर विभाग प्रमुख अंबरीन नेमन, कॅप्टन राहुल गायकवाड, सामाजिक कार्यकर्ता आश्रफ घट्टे आदी उपस्थित होते.सहा डॉक्टर, १० सिस्टरचा समावेशनव्याने सुरु करण्यात आलेल्या या आय.सी.वार्डमध्ये सहा डॉक्टर्स, १० सिस्टर, ०८ सफाई कर्मचारी असा सह अधिकारी व १८ कर्मचारी असणार आहेत. अलिबागमधील डॉक्टर विनित शिंदेंसह इतर खाजगी प्रॅक्ट्रीस करणारे डॉक्टरांचाहीसमावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याAditi Tatkareअदिती तटकरे