शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: काेराेना विद्यार्थ्यांना पावला, शाळांना काेपला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2021 00:24 IST

जिल्ह्यातील आठवीपर्यंतचे तीन लाख विद्यार्थी विनापरीक्षा पास

रायगड : जिल्ह्यातील पहिली ते आठवीचे तब्बल तीन लाख ७६ हजार २२२ विद्यार्थी थेट पास झाले आहेत. गेल्या वर्षभरापासून सुरू असलेल्या काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना काेराेना पावला असे बाेलले जात आहे. मात्र शाळांमध्ये परीक्षाच हाेणार नसल्याने पालक शाळांमध्ये फी भरणार नाहीत. त्यामुळे काही शाळा या आर्थिक अडचणीत सापडण्याची शक्यता आहे.सध्या रायगड जिल्ह्यामध्ये सरासरी ५०० पेक्षा अधिक रुग्ण सापडत आहेत. राज्यामध्ये वेगळी परिस्थिती नसल्याने काेराेना संसर्गाचा धाेका अधिक वाढला आहे. वाढत्या काेराेनाला राेखण्यासाठी सुरुवातीला सरकारने शाळा, विद्यालये, महाविद्यालये बंद ठेवली हाेती. त्यानंतर पुन्हा सुरू केली हाेती, मात्र आता सरकारने ते बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. पहिली ते आठवीच्या परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. त्यामध्ये सरकारी, खासगी, जिल्हा परिषद, पालिका, अनुदानित, विनाअनुदानित, कायम विनाअनुदानित शाळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील तब्बल तीन लाख ७६ हजार ९३३ विद्यार्थ्यांना या निर्णयाचा लाभ हाेणार आहे. मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सरकारने शिक्षण विभागासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मात्र परीक्षाच झाली नसल्याने मुलांना पास करण्याचा निर्णय मुलांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारा आहे. ऑनलाइन शिक्षण आणि ऑनलाइन परीक्षा हा अंतिम उपाय नाही.- संजीव नाईक, पालकसरकारने निर्णय घेतला आहे म्हणजे सर्व बाजू तपासूनच घेतला असणार. आधी शाळा पूर्ण क्षमतेने सुरू करता आल्या नाहीत. आता सर्वच मुले पास असा निर्णय घेण्याची सरकारवर पुन्हा वेळ येऊ नये असे वाटते.- अविनाश पाटील, पालकसरकारने सरसकट मुलांना पास करण्याचा निर्णय घेणे हास्यास्पद आहे. ऑफलाइन परीक्षा घेता येत नसेल तर किमान ऑनलाइन तरी परीक्षा घेणे गरजेचे हाेते. परीक्षाच हाेणार नसेल, तर पालक शाळेमध्ये फी भरणारच नाहीत. त्यामुळे कायम विनाअनुदानीत शाळा आर्थिक अडचणीत सापडतील आणि हे अत्यंत धाेकादायक आहे.- अमर वार्डे, शिक्षणतज्ज्ञसर्वांनाच पास करण्याचा निर्णय घेताना सरकारला आनंद झाला असेल असे मला वाटत नाही. काेराेनामुळे हा निर्णय घ्यावा लागला आहे. या निर्णयामुळे प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्यांच्या मनावरही निश्चित परिणाम झाला आहे.- दयानंद गावडे, पालकपरीक्षा न देताच मुले पास हाेणे म्हणजे मुलांच्या भवितव्याचा पायाच कमकुवत करण्यासारखे आहे. परंतु काेराेनाच्या महामारीच्या संकटापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. त्याला सरकार तरी काय करणार?- हाफीज गाेंडेकर, पालक

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस