शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

CoronaVirus News: नागरिकांच्या प्रतिकारशक्तीने कोरोनाशी लढा ठरतोय प्रभावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 9, 2020 00:04 IST

कोरोना रुग्णसंख्येत घट; मृतांचा आकडा काळजाचा ठोका चुकवतोय

- आविष्कार देसाई रायगड : गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येमध्ये कमालीची घट होताना दिसत आहे. नागरिकांच्या शरीरामध्ये प्रतिकारशक्ती वाढत असल्याचा दावा तज्ज्ञांनी केला आहे. रुग्णसंख्येमध्ये घट होताना दिसत असली तरी मृतांचा आकडा हा तीन टक्केच असल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.जुलै आणि सप्टेंबर महिन्यात कोरोनाची लाट अधिक प्रखर होणार असल्याचा इशारा जागतिक आरोग्य संघटनेने दिला होता. त्यानुसार कोरोनाचा कहर आपल्याला सर्वत्र दिसून आला आहे. रायगड जिल्ह्यामध्ये ८ मार्च रोजी पहिला कोरोनाचा रुग्ण सापडला होता. मा$र्च महिन्यामध्ये देशभर लॉकडाऊन जाहीर झाला होता. पुढे तो सोयीनुसार वाढविण्यात आला होता. सर्वत्रच व्यवहार ठप्प असल्याने कामगार, शेतकरी, मजूर, छोटे-मोठे व्यावसायिक यांच्यावर उपासमारीची वेळ आली होती. त्यानंतर आता पुन्हा सर्व व्यवहार सुरळतीपणे सुरू करण्यात आले आहेत.रुग्णसंख्येत होणारी वाढ आता कमी होत आहे. सप्टेंबर महिन्यात जिल्ह्यातील आकडा सुमारे ७०० पर्यंत गेला होता. आता तोच आकडा ३५०च्या आसपास आहे. नागरिकांच्या शरीरात प्रतिकारशक्ती निर्माण झाल्याचाच हा परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. मात्र विविध आजार असणाऱ्यांना मृत्यू कवटाळत आहे. हे चित्र सर्वांचीच चिंता वाढवणारे आहे.खासगी रुग्णालयांकडून आर्थिक लूट सुरूखासगी रुग्णालये रुग्णांकडून लाखोंची बिले उकळतात. सरकारने लेखापरीक्षण समिती स्थापन केली. मात्र त्या समितीनेही खासगी रुग्णालयांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले. सामाजिक कार्यकर्ते कांतीलाल कडू यांनी तक्रार केल्यावर जिल्हाधिकारी यांनी कारवाईचे आदेश काढले होते.नागरिकांंमध्ये प्रतिकारशक्ती निर्माण झाली आहे. त्यामुळे त्यांच्याकडून उपचाराला चांगला प्रतिसाद मिळत आहे. कोरोनाबाबत जनजागृती करण्यात येत आहे. त्यामुळे ते सर्वांच्याच फायद्याचे ठरत आहे.- डॉ. सुहास माने, जिल्हा शल्यचिकित्सक, रायगडपॉझिटिव्ह रुग्णांमध्ये8% ० ते 17 वर्ष वयोगट10% 18 ते 25 वर्ष वयोगट42% 26 ते 44 वर्ष वयोगट41% 45 ते 60 पेक्षा जास्त वयोगट3525 दररोज रुग्णांची तपासणी 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या