शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News : उरणमध्ये आठवडाभरात ५० बेडचे रुग्णालय, सिडको करणार उभारणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2020 00:12 IST

CoronaVirus News in Uran : उरणमधील कोवीड रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथे जावे लागते. अनेक वेळा तर कोविड रुग्णांसाठी नवी मुंबई व मुंबई येथेही बेड उपलब्ध होत नाहीत.

उरण : सिडकोच्या माध्यमातून उरणमध्येच बोकडविरा येथील सिडकोच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये येत्या आठवडाभरात डेडीकेटेड कोव्हीड हेल्थ सेंटर सुरू होणार आहे. यामुळे येथील कोविड रुग्णांवर उरणमध्येच उपचार करणे शक्य होणार असल्याची माहिती सिडकोचे सीएचओ डॉ.बी.एस.बावीसकर यांनी दिली.

उरणमधील कोवीड रुग्णांसाठी ऑक्सिजनची व्यवस्था नसल्याने रुग्णांना उपचारासाठी नवी मुंबई व मुंबई येथे जावे लागते. अनेक वेळा तर कोविड रुग्णांसाठी नवी मुंबई व मुंबई येथेही बेड उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे उपचाराअभावी अनेक रुग्णांवर दुर्दैवाने प्राण गमावण्याची पाळी आली. कोरोनाचे संकट आणि त्याच्या वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी उरणकरांसाठी उरणमध्येच उपचार होणे गरजेचे झाले आहे. त्यामुळे उरणमध्येच सर्व सोईसुविधांसह कोविड सेंटर उभारण्यात यावे, यासाठी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख माजी आमदार मनोहर भोईर यांच्याकडून शासनस्तरावर प्रयत्न सुरू होते. मुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, सिडको, जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसेनेच्या वतीने मनोहर भोईर यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मनोहर भोईर यांच्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.उरणमध्येच कोविड रुग्णांच्या उपचारासाठी सोय उपलब्ध करून देण्याबाबत सोमवारी (२) जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीस रायगड सिव्हिल सर्जन सुहास माने, रायगड डीएचओ सुधाकर मोरे, सिडकोचे सीएचओ डॉ.बी.एस.बावीसकर, उरण इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.मनोज भद्रे, उरण मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.विकास मोरे, उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे, माजी आमदार मनोहर भोईर, सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

आरोग्य विभागाकडून विविध नेमणुका५० बेडच्या या कोविड सेंटरमध्ये ऑक्सिजनची व्यवस्था करण्यात येणार आहे, तसेच जिल्हा आरोग्य विभागाकडून फिजिशियन, इंटेन्ससिव्हिक अशा नेमणुकाही करण्यात येणार आहेत. यासाठी आवश्यक असलेल्या खर्चाची तातडीने तरतूद करण्यात आली असून, हे डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर येथल्या आठवडाभरात सुरू होणार असल्याची माहिती डॉ.बी.एस.बावीसकर यांनी दिली.

शहरवासीयांना दिलासाया बैठकीत उरणमधील कोविड रुग्णांसाठी बोकडविरा येथील सिडकोच्या ट्रेनिंग सेंटरमध्ये लवकरच उरणमध्ये सिडकोच्या माध्यमातून आयसीयू व्यवस्था वगळता डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती सिडकोचे सीएचओ डॉ.बी.एस.बावीसकर यांनी दिली. त्यामुळे उरणकरांना दिलासा मिळणार आहे. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस