शहरं
Join us  
Trending Stories
1
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
2
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
3
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
4
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
5
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
6
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
7
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
8
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
9
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
10
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
11
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
12
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
13
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
14
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
15
वैमानिकांच्या नव्या वेळापत्रकाला स्थगिती; मनुष्यबळ कमतरतेमुळे डीजीसीएचा निर्णय
16
एक लाख तीन हजार कोटींची वीजग्राहकांकडे थकबाकी; कृषी ग्राहकांनी थकवले ८० हजार कोटी
17
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
18
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
19
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
20
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: ना थरावर थर ना खालूचा आवाज घुमला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2020 00:19 IST

पोलादपूर : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी ...

पोलादपूर : देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी म्हणजे गोकुळाष्टमी, कृष्ण जन्माचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो, तर दुसऱ्या दिवशी दहीहंडी खेळण्यात येत असते. मात्र, या वर्षी देशभरात कोरोनासारख्या महामारीने पाय घट्ट रोवले असल्याने सणासुदीवर निर्बंध आले आहेत. थरावर थरासह गावरान खालुबाजाच्या आवाजासह डीजेचा आवाज घुमला नसल्याने शांतता होती. यामुळे बाळगोपाळांचा मात्र हिरमोड झाला आहे. असे जरी असले, तरी घरोघरी श्रीकृष्ण जन्मोत्सवाची पूजा उत्साहात करण्यात आली.पोलादपूरमध्ये सार्वजनिक ७६ व गुजराती समाजाच्या ७ हंडी दरवर्षी फोडण्यात येतात. मात्र, या वर्षी कोरोनाची सावट लक्षात घेता रद्द करण्यात आल्याची माहिती प्राप्त झाली. मात्र, मानाच्या व नवसाच्या हंडी मात्र मोजक्या नागरिकांच्या उपस्थित फोडण्यात आल्या. या वर्षी हा उत्सव रद्द करण्यात आल्याने या वर्षी ना खालूचा आवाज ना डीजेचा सूर ऐकायला मिळणार नसल्याची खंत गोपाळ भक्त व्यक्त करत आहेत.पनवेलमध्ये साध्या पद्धतीने दहीहंडी उत्सवपनवेल : पनवेलमध्ये या वर्षी सर्वच सार्वजनिक दहीहंड्या रद्द करण्यात आल्या आहेत. असे असले, तरी शहरवासीयांनी अगदी साध्या पद्धतीने हा उत्सव साजरा केला. सोशल डिस्टन्स पाळत पारंपरिक पद्धतीने दहीकाल्याचा उत्सव साजरा करण्यात आला.पनवेल शहरातील शेकडो वर्षाची परंपरा असलेली बापट वाडा येथील दहीहंडीही अगदी साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. दरवर्षी मोठ्या उत्साहात तरुण एकत्रित येऊन या उत्सवात सहभागी होतात.प्रशासनाच्या सूचनेनुसार हा दहीहंडी उत्सव मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पार पडला. शहरात सोसायटीच्या आवारातही अशाच पद्धतीने हा उत्सव पार पडला, तर ग्रामीण भागातही पारंपरिक मानाच्या दहीहंड्या फोडण्यात आल्या.मंदा म्हात्रे यांनी केली गोवर्धनी मातेची पूजाबेलापूर येथील श्री गोवर्धनी माता मंदिराच्या तेराव्या वर्धपान दिनाचे औचित्य गोकुळाष्टमीनिमित्त बेलापूरच्या आमदार यांनी मंदिरात नवचंडी होम हवनचे आयोजन केले होते. कोरोनाचा नायनाट व्हावा, विस्कळीत झालेले जनसामान्यांचे जनजीवन पूर्ववत व्हावे, सर्वांना सुख, शांती आणि समृद्धी प्राप्त व्हावी, अशी श्री गोवर्धनी मातेकडे प्रार्थना केल्याचे मंदा म्हात्रे यांनी कळविले आहे.लाख मोलाच्या ३६० दहीहंड्यांना यंदा ब्रेकबेलापूर, नेरुळ, तुर्भे, वाशी, कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली आणि दिघा या महापालिकेच्या आठ विभागांत दरवर्षी हा सण मोठ्या जल्लोषात उत्साहात पार पडत होता. लाखो रुपयांच्या बक्षिसांची लयलूट होत असते. नवी मुंबईत लहान-मोठ्या ३६0 दहीहंड्या बांधल्या जातात, परंतु या वर्षी या सर्व दहीहंड्या रद्द केल्याचे संबंधित आयोजकांनी जाहीर केले होत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याDahi Handiदहीहंडी