शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: लॉकडाऊन हा पर्याय नाही; नियमांचे पालन न केल्यास कारवाईचा बडगा उगारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 23:42 IST

कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी आणि आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच अलिबागमधील व्यापारी, दुकानदार व्यावसायिक यांना सूचना देण्यात येतील.

रायगड : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावावर लॉकडाऊन हा एकमेव पर्याय नाही. नागरिकांनीच कोरोनाचे गांभीर्य ओळखून नियमांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे, असे अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी ‘लोकमत’ला सांगितले. कोरोनासंबंधातील नियमांचे पालन करणे बंधनकारक आहे, अन्यथा कारवाईला तयार राहा, असा इशाराही ते द्यायला विसरले नाहीत.

रोहा, कर्जत, पेण, मुरुड आणि श्रीवर्धन शहरांमध्ये तीन दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. त्या पार्श्वभूमीवर अलिबाग या महत्त्वाच्या शहरात मात्र अनलॉक आहे. शहरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाही नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दी करताना दिसून येत आहेत. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. मात्र, कोरोनाला रोखण्यासाठी लॉकडाऊन प्रभावी उपाय नसल्याचे नाईक यांनी सांगितले. सरकारनेही लॉकडाऊन करण्याला विरोध केला आहे. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनीही जिल्ह्यात लॉकडाऊन करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, स्थानिक पातळीवरील परिस्थित पाहून संबंधित स्वराज्य संस्था आवश्यक तो निर्णय घेऊ शकतात, असेही त्यांनी सांगितले आहे. त्यानुसार, संबंधित ठिकाणी कोरोनाचा प्रादुर्भाव पाहून निर्णय घेतले जात आहेत. सर्वत्रच कोरोनाचा वाढता संसर्ग सरकार आणि प्रशासनाची डोकेदुखी ठरत आहे.

सध्या तालुक्यातील कोरोनाचा वाढता आकडा सर्वांचीच डोकेदुखी ठरली आहे. कोरोनाची चेन तोडण्याकरिता काही शहरांमध्ये तीन-चार दिवसांचा लॉकडाऊन घेण्यात आला आहे, तर काही शहर त्या दिशेने विचार करत आहेत. पेण, कर्जत, रोहा, मुरुड आणि श्रीवर्धन शहरांमध्ये लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे शहरातील सर्व व्यवहार ठप्प झाले असल्याने बाजारपेठ, तसेच दुकानांमध्ये नागरिकांची गर्दी कमी झाल्याचे चित्र आहे. हे जरी खरे असले, तरी तेथील कोरोनाचा वाढता संसर्ग थांबलेला नाही, ही वस्तुस्थिती आपण नाकारू शकत नाही, असे प्रशांत नाईक यांनी स्पष्ट केले. काही दिवसांपासून सलून सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आता पुन्हा लॉकडाऊन करून त्यांचे अथवा अन्य व्यापाऱ्यांचे आर्थिक नुकसान करणे योग्य ठरणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.रायगड जिल्ह्यात ३४४९ कोरोनाबाधित1) जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या ३४४९ वर गेली आहे. आतापर्यंत १२८ रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. उरण तालुक्यात २५५, कर्जत १२८, अलिबाग ११५ आणि पेणमध्ये १०१ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. अन्य तालुक्यांमधील हाच आकडा १०० च्या खाली आहे.2) शहरांचा विचार केल्यास पेण, रोहा, कर्जत या शहरांमध्ये कोरोनाने कहर केलेला आहे. त्या तुलनेत अलिबागची परिस्थिती बरी आहे.3) अलिबाग शहराला काही महत्त्वाच्या ग्रामपंचायती लागून आहेत. त्यांच्या हद्दीमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे संसर्गाचा धोका संभवतो, परंतु नागरिकांनीच खबरदारी घेतली पाहिजे. नगरपालिका प्रशासन नागरिकांच्या सोबत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता, कामाव्यतिरिक्त घराबाहेर पडू नये. सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी केले.नागरिकांनी खबरदारी घ्यावीकोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने खबरदारी आणि आवश्यक असलेल्या नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. याबाबत लवकरच अलिबागमधील व्यापारी, दुकानदार व्यावसायिक यांना सूचना देण्यात येतील. त्यांनी आपल्या येथील गर्दी कमी करून सामाजिक अंतर राखण्यासाठी, तसेच सॅनिटायझरचा वापर बंधनकारक करण्यात येणार आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारणार असल्याकडेही नाईक यांनी लक्ष वेधले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस