शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: हाॅटेलबंदीने महिलांची चपाती-भाकरी हिरावली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2021 00:35 IST

लॉकडाऊनचा व्यावसायिकांना फटका

रायगड : काेराेनाच्या वाढत्या प्रभावापुढे सर्वांनीच हात टेकले आहेत. सरकारने तर राज्यात मिनी लाॅकडाऊन लावले आहे. त्यामुळे बहुतांश व्यवहारांवर बंधने आली आहेत. हाॅटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. हाॅटेल इंडस्ट्री आर्थिक अडचणीत आली असतानाच त्या ठिकाणी चपाती आणि भाकरी पुरविणाऱ्या महिलांवरदेखील उमासमारीची वेळ आली आहे. काेराेनाचा कहर सातत्याने वाढत आहे. जगाच्या तुलनेमध्ये महाराष्ट्र राज्य चाैथ्या स्थानावर आहे. त्यामुळे काेराेनाला राेखण्यासाठी राज्य सरकारने मिनी लाॅकडाऊन लावले आहे. त्यामुळे बहुतांश व्यवहार ठप्प झाले आहेत. त्यामध्ये हाॅटेल व्यवसाय बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिले आहेत. नऊ महिन्यांपासून ठप्प असणाऱ्या हाॅटेल व्यवसायाला गती येत असतानाच आता पुन्हा लाॅकडाऊनमुळे हाॅटेल व्यावसायिक आर्थिक संकटात सापडणार आहेत. त्याचप्रमाणे येथील विविध हाॅटेलमध्ये स्थानिक महिला चपाती आणि भाकरी पुरवितात. आता हाॅटेल व्यवसाय बंद राहणार असल्याने त्यांच्या व्यवसायावरही संक्रांत आली आहे.वर्ष कसे काढले आमचे आम्हालाच ठाऊक  चपाती, भाकरी हाॅटेलसाठी पुरविल्याने आम्हाला चार पैसे मिळायचे. सर्व सुरळीत सुरू हाेते. मात्र, २०२० साली आलेल्या काेराेना महामारीमुळे हाॅटेल व्यवसाय बंद हाेता. त्यामुळे आमचेही व्यवसाय बंद झाले.तब्बल नऊ महिन्यांनंतर पुन्हा व्यवहार पूर्वपदावर आले असतानाच पुन्हा काेराेनाचे संकट वाढले आहे. आता पुन्हा हाॅटेल बंद करण्याचे आदेश सरकारने दिले.गेले वर्षभर काम नसल्याने आम्ही कसे दिवस काढले आमचे आम्हालाच माहिती आहे. आता पुन्हा लाॅकडाऊन केल्याने जगण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.लाॅकडाऊनच्या निर्णयामुळे हाॅटेल व्यवसाय बंद करावे लागले आहेत. त्याचा विपरीत परिणाम आमच्या व्यवसायावर झाला आहे. काेराेनामुळे नागरिक घराबाहेर पडणार नाहीत. हाॅटेलमध्ये गर्दी होणार नाही. त्यामुळे आमच्याकडून भाकऱ्या काेण घेणार. आमच्यावर आर्थिक संकट ओढावले आहे.- गुलाब म्हात्रेहाॅटेलमध्ये चपाती, भाकरी देण्याचे काम आम्ही करताे. त्याच्यावरच आमचा उदरनिर्वाह सुरू आहे. आता मात्र सरकारने हाॅटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आपाेआपच आमच्याही व्यवसायवर संक्रांत आली आहे.- जयश्री भगतकाेराेना यावर्षीसुद्धा पाठ साेडायला तयार नाही. गेले वर्षभर आर्थिक अडचणीचे हाेते. आताही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. व्यवसाय ठप्प झाल्याने जगायचे कसे, असा प्रश्न पडला आहे.- नीता म्हात्रे

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या