शहरं
Join us  
Trending Stories
1
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
2
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
3
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
4
Latest Marathi News LIVE: इस्रायलच्या हल्ल्यात 203 लोकांचा मृत्यू, १००० पेक्षा जास्त जखमी
5
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
6
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
7
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
8
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
9
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
10
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
11
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
12
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
13
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
14
जगात काहीतरी मोठे घडणार? छोटासा देश सोन्याच्या मागे लागला; खरेदीचा आकडा बघून RBI लाही चिंता वाटू लागली...
15
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
16
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
17
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
18
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
19
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
20
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: कर्जत आजपासून तीन दिवस बंद; व्यापारी फेडरेशनच्या बैठकीत निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2020 01:38 IST

यापूर्वी बंद पाळताना जीवनावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीपाला, औषधांची दुकाने, दवाखाने सुरू असायचे मात्र या बंदच्या वेळी केवळ वैद्यकीय सुविधा म्हणजे औषधांची दुकाने व दवाखानेच सुरू राहतील

कर्जत : तालुक्यात कोरोनाचा ससेमीरा सुरू आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना पसरला आहे. यापार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापाऱ्यांनी सोमवारपासून तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमधून फक्त वैद्यकीय सुविधांना वगळण्यात आली आहे.

तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही रुग्ण नव्हता, मात्र काही दिवसांनी कोरोनाने तालुक्यात शिरकाव केला आणि हळूहळू त्याने आपला पसारा वाढवला. लॉकडाऊन काढण्यात आल्यानंतर कर्जत शहरा बरोबरच तालुक्यात कोरोनाचे रुग्ण जास्त प्रमाणात सापडत आहेत. शहरा लगतच्या गावांमध्ये सुद्धा लक्षणीय रुग्ण आढळत आहेत. अल्पावधीतच शतक पार करून कोरोनाची वेगाने वाटचाल सुरू आहे. कोरोनाला रोखण्यासाठी रविवारी कर्जतच्या व्यापारी फेडरेशनने तातडीची सभा बोलवली. यावेळी सोमवारपासून तीन दिवस कर्जत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.

यापूर्वी बंद पाळताना जीवनावश्यक सेवा म्हणजे किराणा दुकान, दूध डेअरी, भाजीपाला, औषधांची दुकाने, दवाखाने सुरू असायचे मात्र या बंदच्या वेळी केवळ वैद्यकीय सुविधा म्हणजे औषधांची दुकाने व दवाखानेच सुरू राहतील असे ठरविण्यात आले. या वेळीव्यापारी फेडरेशनचे अध्यक्ष मयूर जोशी, सचिव राजेश ओसवाल, सुमेश शेट्ये, मोहन ओसवाल, रणजित जैन, मदन परमार, महेंद्र बोडके, विक्रम ओसवाल, मंगल परमार, रामकिशोर गुप्ता, आशिष शहा, अनुप मावळे, शेखर बोराडे, किरण ओसवाल आदी प्रमुख व्यापारी उपस्थित होते.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस