शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus: माथेरानमधील हातरिक्षा चालकांची उपासमार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2020 01:17 IST

शासनाच्या मदतीची प्रतीक्षा; पर्यटन बंद असल्याने उदरनिर्वाहाचा प्रश्न गंभीर

माथेरान : कोरोनामुळे राज्यात सर्वत्र व्यवहार बंद करण्यात आल्यामुळे माथेरानमध्येसुद्धा १८ मार्चपासून पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. एका महिन्यापासून कोरोनाच्या जागतिक संकटामुळे येथे स्मशानशांतता पसरली आहे. हातावर पोट भरण्यासाठी केविलवाणी धडपड करणाऱ्या या गरीब श्रमिकांच्या भावनेकडे अद्याप येथील लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रित केले आहे, ना शासनाने काही मदत दिली आहे. त्यामुळे येथील हातरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ येऊन ठेपली आहे.मोटार वाहनांना बंदी असल्याने केवळ पर्यटन, शेतीवर येथील जीवनमान अवलंबून आहे. त्यामुळे मोलमजुरी करणाऱ्यांपासून ते मोठ्या हॉटेल व्यावसायिक या सर्वांचा संसाराचा गाडा पर्यटनावर आधारित आहे. माथेरानमध्ये ब्रिटिश काळापासून हातरिक्षा हेच वाहतुकीचे मुख्य साधन. अर्थातच वयोवृद्ध ज्येष्ठ पर्यटकांना याच वाहनांची नितांत आवश्यकता असते. त्या वेळेस येथील हातरिक्षा चालक स्वत: ही अतिकष्टदायक कामे करत आपल्या रक्ताचे पाणी करून पर्यटकांना बाराही महिने सेवा उपलब्ध करून देत असतात. ही कामे करण्यासाठी स्थानिकांसह नांदेड, यवतमाळ, अकोला येथून श्रमिक आलेले आहेत. अनेक वर्षे हे श्रमिक पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देत आहेत. परंतु सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व व्यवहार पूर्णत: बंद करण्यात आल्यामुळे आपल्या कुटुंबातील सदस्यांचा उदरनिर्वाह करणे म्हणजे मोठे आव्हान त्यांच्यापुढे उभे राहिले आहे. त्यातच येथील राजकीय मंडळींनी तसेच विविध स्वयंसेवी संस्थांनी सातत्याने केवळ घोड्यांच्या खाद्यासाठी पुढाकार घेतला आहे तर माथेरानप्रेमी मुंबइतील दानशूर व्यक्तींकडून घोड्यांना खाद्य पुरविले जात आहे; परंतु हातरिक्षा चालकांकडे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे. यामुळे हातरिक्षा चालकांवर उपासमारीची वेळ आली आहे. शाासनाने तरी लक्ष द्यावे, अशी मागणी या श्रमिकांकडून होत आहे.सायकल रिक्षाचालकांना त्या त्या राज्यांमधील सरकार अशा आणीबाणीच्या काळात आर्थिक मदत करीत आहे. आपल्या रक्ताचे पाणी करीत माथेरानच्या पर्यटनस्थळावर हातरिक्षा चालवणाºया चालक व मालकांनादेखील आर्थिक मदत शासनाने द्यावी.- सुनील शिंदे, सचिव, श्रमिक रिक्षा संघटना