शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
2
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
3
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
4
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
5
जातनिहाय जनगणनेला RSS ने दीड वर्षांअगोदरच केरळमधून दाखविला होता हिरवा झेंडा
6
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
7
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
8
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
11
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
12
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
13
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
14
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
15
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
16
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
17
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
18
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
19
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
20
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत

CoronaVirus : अफवा पसरवू नका अन्यथा कारवाई, जिल्हा पोलीस अधीक्षकांचा इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 01:13 IST

सध्या विविध समाज माध्यमांवर कोरोनाबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अलिबाग : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने संचारबंदी आणि लॉकडाउनचे पाऊल उचललेले आहे. सध्या विविध समाज माध्यमांवर कोरोनाबाबत उलट-सुलट चर्चेला उधाण आले आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड प्रमाणात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याची गंभीर दखल रायगड जिल्हा पोलिसांनी घेतली आहे. खोट्या अफवा पसरवून समाज स्वास्थ बिघडविणाऱ्यांची गय केली जाणार नाही, असा सज्जड दम जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी दिला आहे. नागरिकांना कोणतीही तक्रार करायची असल्यास त्यांना १०० नंबरवर तक्रार नोंदवावी, असे आवाहन त्यांनी केले आहे.कोरोना विषाणूसंदर्भात काही समाजकंटक व असामाजिक संघटनेकडून व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक, टिष्ट्वटर, इंस्टाग्राम, टिकटॉक व इतर समाज माध्यमांद्वारे अक्षेपार्ह संदेश पोस्ट करण्यात येत आहेत. त्यामुळे अफवांवर विश्वास ठेवू नये, तसेच सोशल मीडियाचा काळजीपूर्वक वापर करावा, अन्यथा अशा पोस्ट प्रसारित करणारे व्यक्ती व सोशल मीडियावरील त्या ग्रुपचे अ‍ॅडमीन, पोस्टवर अक्षेपार्ह प्रतिक्रि या नोंदविणारी व्यक्ती, अशा सर्वांवर भारतीय दंड विधान, माहिती तंत्रज्ञान अधिनियम आपत्ती व्यवस्थापन अधिनियम व इतर प्रचलित विविध कायद्यानुसार गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येणार आहेत.कोरोना या संसर्गातून होणाºया रोगाची कुणीही भीती बाळगू नका, काळजी हाच त्यावरील उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळा, सार्वजनिक कार्यक्रमात काही काळ सहभागी होणे टाळा, हस्तांदोलन टाळा, काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुवा आणि वेळोवेळी तोंडावर हात नेऊ नका, सोशल डिस्टन्सिंग ठेवा, मास्कचा वापर करा, घरातून बाहेर पडू नका, प्रशासनाला सहकार्य करा, असे अवाहन जिल्हा पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी रायगडकरांना केले आहे.>सायबर शाखेची करडी नजरजिल्हा पोलीस सायबर शाखा सोशल मीडियावर नजर ठेवून आहे. कोणत्याही प्रकारचे आपत्तीजनक व दोन समाजात तेढ निर्माण करणारे संदेश, व्हिडीओ प्रसारित केल्याचे आढळून आल्यास हेल्पलाइन क्रमांक १०० या कमांकावर संपर्क साधावा, जिल्ह्यात शांतता व सामाजिक सलोखा अबाधित राखण्यासाठी पोलीस दलास सहकार्य करावे, असे आवाहन पोलीस अधीक्षक अनिल पारस्कर यांनी केले आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या