शहरं
Join us  
Trending Stories
1
Rohini Khadse : "प्रत्येक गोष्टीला वेळ..."; रेव्ह पार्टीमध्ये पतीला अटक झाल्यावर रोहिणी खडसेंची पहिली प्रतिक्रिया
2
शिंदेसेनेच्या मंत्र्यांना बदनाम करण्याचा कट रचला जातोय का?; रामदास कदमांनी व्यक्त केली शंका
3
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
4
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
5
रेपो रेट कपातीचा फायदा वाहन कर्जांना देत नाहीत; खासगी बँकांविरोधात फाडाची रिझर्व्ह बँकेकडे तक्रार
6
IND vs ENG : 'गंभीर' मुद्दा! गिलला कदाचित कुलदीपला खेळवायचे होते, पण... गावसकरांचा रोख कुणाकडे?
7
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
8
"तू सिंगल आहेस का?" रिंकू राजगुरूला चाहत्याचा प्रश्न, अभिनेत्रीने रिलेशनशिप स्टेटसच सांगितलं, म्हणाली...
9
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
10
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
11
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
12
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
13
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
14
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
15
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
16
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
17
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
18
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
19
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
20
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले

Coronavirus: परराज्यातील नागरिकांना मिळाला ‘रायगड ई-पास अ‍ॅप’चा आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2020 01:16 IST

संबंधित जिल्हाधिकाºयांकडून सहमती मिळाल्यानंतर मजुरांना वाहनाद्वारे मूळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

अलिबाग : लॉकडाउनमुळे अडकून पडलेल्या परराज्यातील नागरिकांना त्यांच्या मूळ गावी परत जाण्यासाठी महाराष्ट्र शासनाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या आहेत. त्याकरिता जिल्हाधिकाऱ्यांना प्राधिकृत अधिकारी म्हणून घोषित केले आहे.

रायगड जिल्ह्यातून परराज्यामध्ये जाऊ इच्छिणाºया कामगार/पर्यटक/भाविक/ विद्यार्थी व इतर व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये जाण्याकरिता निश्चित कार्यपद्धती अवलंबविण्याचे नियोजन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. यामध्ये सध्या विविध कॅम्पमध्ये जे मजूर आहेत, त्याबाबत ते ज्या राज्यातील निवासी आहेत, अशा जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना मजूरांच्या यादीसह संपर्क साधून सहमतीघेण्यात येणार आहे. संबंधित जिल्हाधिकाºयांकडून सहमती मिळाल्यानंतर मजुरांना वाहनाद्वारे मूळ निवासाच्या ठिकाणी पाससह पाठविण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे.

इतर राज्यातील व्यक्ती ज्या रायगड जिल्ह्यात अडकून पडल्या असतील व त्यांना मूळ गावी वास्तव्याच्या जिल्ह्यात जायचे असल्यास अशा व्यक्तीच्या नावासह तसेच वाहनाचा प्रकार व क्रमांक या बाबी नमूद करून रायगड जिल्ह्यातील ‘रायगड ई- पास’वर अ‍ॅपवर अर्ज करावा. त्याचप्रमाणे रायगड जिल्ह्यातून बाहेर राज्यामध्ये जाणाºया व्यक्तींनाही या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. रायगड जिल्ह्यातून बाहेर राज्यामध्ये जाणाºया कामगार / पर्यटक / भाविक / विद्यार्थी व इतर व्यक्तींनी वाहतूक/प्रवास करण्यासाठी वरील गुगल लिंकमध्ये माहिती भरल्यानंतर तसेच रायगड ई-पास अ‍ॅपद्वारे अर्ज केल्यानंतर परराज्यात जाऊ इच्छिणाºयांसाठी जिल्हा प्रशासनाकडूनरविवार, ३ मे २०२० पासून परवानगी देण्यास सुरुवात केली जाणार आहे.

प्रवास करण्यापूर्वी प्रत्येक व्यक्तीने ते सध्या जेथे राहत आहेत, तेथील प्राथमिक आरोग्यकेंद्र / ग्रामीण रुग्णालय / उप जिल्हा रुग्णालय / जिल्हा रुग्णालय किंवा नोंदणीकृत खासगी दवाखाना येथे संपर्क साधून संबंधित डॉक्टरकडून स्वत:ची तपासणी करून वैद्यकीय प्रमाणपत्रउपलब्ध करून घेणे बंधनकारक राहील व ते वैद्यकीय प्रमाणपत्र प्रवासादरम्यान स्वत:सोबत बाळगणे तसेच स्वत:स १४ दिवस गृह विलगीकरण (होम क्वॉरंटाइन) करून घेणे बंधनकारक असणार आहे.रायगड जिल्ह्यामध्ये परराज्यातील जे मजूर अथवा व्यक्ती अडकल्या आहेत, अशा व्यक्तींनी त्यांच्या राज्यामध्ये किंवा त्यांच्या मूळ निवासाच्या इच्छित स्थळी जाण्याकरिता जिल्हा प्रशासनाने सूचना दिल्याप्रमाणे कार्यवाही करावी व जिल्हा प्रशासनास सहकार्य करावे.- निधी चौधरी, जिल्हाधिकारी, रायगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या