शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

coronavirus : २९ हजार नागरिकांना टंचाईची झळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2020 01:40 IST

कोरोनाशी दोन हात करताना जिल्हा प्रशासनाने १७ टँकरच्या माध्यमातून तब्बल २९ हजार ४३७ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला आहे.

आविष्कार देसाईअलिबाग : रायगड जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणू संसर्गाचे संकट अधिक गहिरे होत असतानाच जिल्ह्यातील १८१ गावे आणि वाड्यांमध्ये पाणीटंचाईने डोके वर काढले आहे. कोरोनाशी दोन हात करताना जिल्हा प्रशासनाने १७ टँकरच्या माध्यमातून तब्बल २९ हजार ४३७ नागरिकांना पाणीपुरवठा सुरू केला आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका हा पेण तालुक्याला बसला आहे. या तालुक्यातील २२ हजार ५८६ नागरिकांना पाणी-पाणी करावे लागत आहे.कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनासह सर्वच सरकारी यंत्रणा झटत आहेत. अलिबाग, पेण, पाली, रोहा, तळा, मुरूड, म्हसळा, महाड, माणगाव या नऊ तालुक्यांमध्ये कोरोनाने शिरकाव केल्याचे समोर आलेले नाही. त्यामुळे हे तालुके ग्रीन झोनमध्ये आहेत. मात्र पनवेल, उरण, कर्जत, खालापूर, श्रीवर्धन आणि पोलादपूर या तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. प्रशासनामार्फत आवश्यक ती सर्व पावले उचलली जात आहेत.दुसरीकडे रायगड जिल्ह्यात पाणीटंचाईने नागरिकांच्या तोंडचे पाणी पळवले आहे. नागरिकांना संचारबंदीमध्ये पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. काही ठिकाणी तर नागरिकांना विकतचे पाणी पिण्याची वेळ आली आहे. गावागावातील नदी, तलाव, विहिरींनी तळ गाठण्यास सुरुवात केली आहे, तर विविध बोअरवेलमधील पाणी आटत चालले आहे. उन्हाचा तडाखा आगामी कालावधीत वाढण्याची शक्यता असल्याने पाणीटंचाईची गंभीर समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.१५ तालुक्यांपैकी ज्या तालुक्यांमध्ये पाणीटंचाईसदृश परिस्थिती आहे अशा तालुक्यांतील गावे, वाड्यांना जिल्हा प्रशासनाकडून टँकर्स, बैलगाडीद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला आहे. पाणीटंचाईचा सर्वाधिक फटका पेण तालुक्याला बसला आहे. येथील १० गावे, ७४ वाड्यांमधील एकूण २२ हजार ५८६ नागरिकांना सात खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. रोहा तालुक्यातील चार गावे, दोन वाड्यांतील दोन हजार ८९६ नागरिकांना एका टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी येथे एका सामाजिक संस्थेची मदत घेण्यात आली आहे. महाड तालुक्यातील पाच गावे आणि ३७ वाड्यांमधील एकूण दोन हजार ३६५ नागरिकांना चार खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे पोलादपूर तालुक्यातील १४ गावे आणि ३५ वाड्यांमधील एकूण एक हजार ५९० नागरिकांना पाच खासगी टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे.>नियमित पाणीपुरवठा करावा - जिल्हाधिकारीजिल्ह्यातील एकूण तालुक्यांपैकी पेण, रोहा, महाड, पोलादपूर या चार तालुक्यांमधील एकूण ३३ गावे, १४८ वाड्या असे मिळून एकूण १८१ गाव/वाड्यांमधील एकूण २९ हजार ४३७ नागरिकांना खासगी आणि सामाजिक संस्थेच्या मदतीने १७ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) सर्जेराव मस्के-पाटील यांनी दिली. पाण्याची गंभीर समस्या उद्भवणार नाही, यासाठी संबंधित यंत्रणेने सतर्क राहावे. नागरिकांना नियमित पाणीपुरवठा करावा, असे आदेश जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी सर्वच यंत्रणांनादिले आहेत.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या