शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
2
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; ६ जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
3
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
4
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
5
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
6
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
7
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
8
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
9
Viral Video: बाईकवरून जात होती तरुणी, पाठीमागून आले अन् नको तिथं...; तरुणांचं घाणेरडं कृत्य कॅमेऱ्यात कैद
10
भाजपचा मास्टरस्ट्रोक! बंगालमध्ये ममतांच्या 'लक्ष्मी भंडार'ला तगडा ठोसा; सत्तेत आल्यास महिला अन् बेरेजगारांना लॉटरी लागणार!
11
Latest Marathi News LIVE Updates: ओवेसींचा मोठा निर्णय! हुमायू कबीरच्या पक्षासोबतची आघाडी तोडली
12
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
13
खळबळजनक! ४० जणांच्या ग्रुपसोबत फिरायला गेली अन् गायब झाली; ३ दिवसांनी सापडला मृतदेह
14
Chanakya Niti: गरिबी येण्यापूर्वी घरात दिसतात 'ही' ५ लक्षणे; आचार्य चाणक्यांनी दिलेला इशारा वेळीच ओळखा!
15
८ रुपयांना खरेदी, ३० रुपयांना विक्री...! हा झुमकेवाला तरुण कमावतोय वर्षाला २७ लाख...
16
सोन्याने पुन्हा पार केला ₹१.५० लाखांचा टप्पा; चांदीतही मोठी उसळी, जाणून घ्या आजचा भाव...
17
चिमुरडींच्या मृत्यूचे गूढ वाढले! आईच्या डायरीत 'पुत्रप्राप्ती'ची ओढ; डोसा थिअरी फेल? आता वेगळाच संशय
18
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, एका रात्रीचं भाडं किती? जाणून थक्क व्हाल
19
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
20
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
Daily Top 2Weekly Top 5

corona vaccination : लस जरा जपूनच वापरा, सरकारचे अलिखित फर्मान, १ एप्रिलपासून हाेणाऱ्या लसीकरणाला फटका बसण्याची शक्यता

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2021 02:18 IST

corona vaccination:  रायगड जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असतानाच काेराेना लसींचा तुटवडा जाणवत आहे. दीड लाख लसींची मागणी केली आहे मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही.

-  आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यात काेराेनाचा कहर वाढत असतानाच काेराेना लसींचा तुटवडा जाणवत आहे. दीड लाख लसींची मागणी केली आहे मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यातच आहे तीच लस जपून वापरा असे अलिखित फर्मान सरकारने काढले आहे. त्यामुळे १ एप्रिलपासून ४५ वर्षांवरील तब्बल साडेसात लाख नागरिकांना करण्यात येणाऱ्या लसीकरणाला फटका बसणार असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील लाेकसंख्येच्या २६ टक्के लाेकसंख्या ही ४५ वर्षाच्या वरील आहे. सुमारे साडे सात लाख नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आराेग्य यंत्रणेने ठेवले आहे. यासाठी तब्बल १६ लाख काेराेनाची लस लागणार आहे. सध्या ८० लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहेत. सुमारे १४० लसीकरण केंद्र उभारल्यानंतरच आणि मागणी केलेली लस उपलब्ध झाल्यावरच उद्दिष्ट गाठणे शक्य हाेणार आहे. सध्या जिल्ह्यात फक्त सुमारे १० हजार लस उपलब्ध आहे. तसेच दीड लाख लसीची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप ती उपलब्ध झालेली नाही. त्यामुळे लसीकरण कसे करणार असा प्रश्न आराेग्य व्यवस्थेसमाेर उभा आहे.४५ वर्षांपुढील साडेसात लाख नागरिकांना करावे लागणार लसीकरणजिल्ह्याच्या लाेकसंख्येच्या २६ टक्के म्हणजेच तब्बल साडेसात नागरिकांना लसीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. त्यामध्ये व्याधी असणाऱ्यांचाही समावेश करण्यात आला आहे. एवढ्या माेठ्या प्रमाणावर लसीकरण करायचे असेल तर जिल्ह्याच्या कानाकाेपऱ्यांमध्ये किमान १४० ठिकाणी सुट्टी वगळता लसीकरण केंद्र सुरु करावे लागणार आहेत. त्याचप्रमाणे सुमारे १६ लाख लस उपलब्ध हाेणे गरजेचे आहे. यासाठी सुमारे तीन महिन्यांचा कालावधी लागणार आहे. सध्या मागणी केलेली लस उपलब्ध झालेली नाही. लसीचा तु़डवडा जाणवत आहे. त्यामुळे लसीकरण कसे करणार असा प्रश्न आहे.सध्या मागणी किती, साठा मिळताे किती...जिल्ह्याला आतापर्यंत ८० हजार ६४४ लस उपलब्ध झालेली आहे. तसेच ती लाभार्थ्यांना टाेचूनही झालेली आहे. सध्या दीड लाख लसींची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र अद्याप प्राप्त झालेली नाही. लस जपून वापरा असे अलिखित निर्देश सरकारने दिले आहेत. त्यामुळे एवढ्या माेठ्या लाेकसंख्येला लसीकरण कसे करायचे असा प्रश्न आराेग्य व्यवस्थेसमाेर उभा आहे.सध्या ४५ वर्षावरील सहव्याधी असलेल्या नागरिकांना काेराेनाची लस देण्यात येणार आहे. तब्बल साडेसात लाख नागरिकांना लस देण्याचे उद्दिष्ट आहे. त्यासाठी १६ लाख डाेस लागणार आहेत. सरकारकडे सध्या दीड लाख लसींची मागणी केली आहे. ती लवकरच प्राप्त हाेईल.- डाॅ.गजानन गुंजकर (निवासी वैद्यकीय अधिकारी, जिल्हा सरकारी रुग्णालय)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCorona vaccineकोरोनाची लसRaigadरायगड