रसायनी : पाताळगंगा-रसायनी या औद्योगिक परिसरात मोहोपाडा-चांभार्ली येथील संपूर्ण रेगे हॉस्पिटल या खासगी रुग्णालयात कोविड १९ लसीकरणास मंजुरी मिळाली असून लसीकरणाचे कामही सुरळीत सुरू होते. मात्र लसीचा तुटवडा असल्याने अनेकांना रिकाम्या हाती परतावे लागले.अलीकडेच ४५ वर्षांवरील सर्वांना लसीकरण येथे सुरू होते. मात्र लस शिल्लक नसल्याने लसीकरणाचे काम थांबलेले आहे. लस उपलब्ध होताच लसीकरण पूर्ववत सुरू राहणार असल्याचे सांगण्यात आले. नागरिकांचा लस घेण्यास चांगला प्रतिसाद आहे. सध्या लस शिल्लक नसल्याने नागरिक चौकशीसाठी फेऱ्या मारत आहेत.
Corona Vaccination: रसायनीत कोविड लसीचा तुटवडा; नागरिकांच्या फेऱ्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:18 IST