शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

8500 शिक्षकांची होणार कोरोना टेस्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2020 00:17 IST

शिक्षक, प्राध्यापकांची कोरोना चाचणी बंधनकारक

अलिबाग : कोरोना संसर्गाचा धोका टाळण्यासाठी खबरदारी म्हणून मागील ८ महिन्यांपासून शाळा बंद होत्या. मात्र येत्या २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर शिक्षण विभागाने सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व मुख्याध्यापकांना कोरोनाची आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक केली आहे. यामध्ये रायगड जिल्ह्यातील सुमारे साडेआठ हजार शिक्षकांची कोरोना टेस्ट केली जाणार आहे. गंभीर बाब म्हणजे जिल्हा सरकारी रुग्णालय आणि पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयातच काेराेना टेस्ट करण्यात येत असल्याने कमी कालावधीत टेस्ट हाेणार कशा, असा प्रश्न आहे.

कोरोना चाचणी केंद्रावर होत असलेली गर्दी, नियोजनाचा अभाव, काही ठिकाणी अनुदानित शाळांतील शिक्षकांनाच मोफत चाचणी करून देण्याचे आदेश व तालुक्यांतील शिक्षकांची चाचणी न करणे अशा अनेक गोष्टींमुळे हा संभ्रम व सावळागोंधळ निर्माण झाला आहे. पनवेल महानगरपालिकेने तर फक्त अनुदानित शाळांची मोफत आरटीपीसीआर चाचणी उपजिल्हा व महानगरपालिका रुग्णालयात होईल, असे सांगितले आहे. 

२३ नोव्हेंबरपासून शाळा सुरू होणार असल्याने मागील चार दिवसांपासून शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी कोरोना चाचणी करून घेण्यासाठी अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात व पनवेल येथील उपजिल्हा रुग्णालयात गर्दी करीत आहेत. दिवसाला २२० ते २४० शिक्षकांची टेस्ट करण्यात येत आहे.- डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक

दिवसाला २२० चाचण्या २३ नाेव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास सरकारने परवानगी दिली आहे.

शिक्षक-प्राध्यापकांची काेराेना चाचणी करण्यात येत आहे. दिवसाला २२० चाचण्या होत आहेत. 

आतापर्यंत सुमारे तीन हजार शिक्षकांच्या काेरोना चाचण्या पूर्ण झाल्या असल्याचा दावा शिक्षण विभागाने केला आहे.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याSchoolशाळा