शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
2
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
3
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
4
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
5
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
6
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
7
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
8
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
9
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
10
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
11
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
12
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
13
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
14
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
15
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
16
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
17
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
18
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
19
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
20
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)

तरुणांमुळेच मुले, ज्येष्ठांमध्ये वाढतोय कोरोनाचा संसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 00:20 IST

बेजबाबदारपणाला घरातल्यांनीच लगाम लावण्याची गरज 

निखिल म्हात्रेलोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : कोरोना विषाणूचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग पसरविण्यासाठी तरुण मंडळी सर्वाधिक कारणीभूत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक घरातच राहत असले तरी त्यांच्याच घरातील तरुण मंडळी विविध कारणांनी बाहेर जाऊन कोरोना घेऊन घरी परत येत असल्यामुळे घरातील मंडळी कोरोनाची शिकार होत असल्याचे दिसत आहे.भाजी, औषधी किंवा किराणा वगैरे घेण्याचे सोडून इतर कामाने किंवा मित्र मंडळींच्या भेटीगाठीसाठी तरुण मंडळी सहजरीत्या घराबाहेर पडत आहेत. कोरोनापेक्षा त्यांना पोलिसांची भीती वाटत असली तरी विविध कारणे पुढे करून ते घराबाहेर पडतात. बाहेरून घरात कोरोना आणल्यावर ते घरातील लोकांच्या संपर्कात येऊन ज्येष्ठ व बालकांना हसत-खेळत कोरोनाची भेट देत आहेत. यामुळेच २४ तास घरातच राहणारे ज्येष्ठ व लहान बालकेही कोरोना पाॅझिटिव्ह आले आहेत. त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्यासाठी त्यांच्याच घरातील तरुण मंडळी कारणीभूत आहेत. ज्या तरुणांनी घरात कोरोना आणला ते सुखरूप आहेत. परंतु घरातील ज्येष्ठांना त्यांनी जीवन - मरणाच्या दारात नेऊन सोडले आहे. तरुणांच्या बेजबाबदारपणाला घरातीलच मंडळींनी लगाम लावण्याची गरज आहे व तेव्हाच कोरोनाला आळा बसेल.

 बाहेरून घरी आल्यास ही घ्या काळजी आपण कामानिमित्त किंवा बाजारातून घरी परतल्यास घरात प्रवेश करण्याच्या अगोदर साबणाने आंघोळ करूनच घरात प्रवेश करावा. जेणेकरून बाहेरून आलेला कोरोना विषाणू घरात प्रवेश करणार नाही.आंघोळ करण्यासाठी काढलेले कपडे व आंघोळीनंतरचे कपडे एका बादलीत कपडे धुण्याचे पावडर असलेल्या पाण्यात भिजत ठेवावेत. भाजीपाला आणल्यास तोही मिठाच्या पाण्यातून धुऊन काढावा. बाहेरून घरी आल्यावर गरम पाणी प्यावे, हळदीचा चहा घ्यावा, गरम अन्न खावे, आइसक्रीम किंवा थंड पदार्थांचे सेवन टाळावे.

नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. नियमितपणे तोंडाला मास्क लावावा. शारीरिक अंतर ठेवूनच इतर आवश्यक कामे करावीत. कोरोनाचा संसर्ग वाढल्यामुळे प्रत्येकाने काळजी घेणे आवश्यक आहे. विनाकारण घराबाहेर पडणारे स्वतःचा व आपल्या कुटुंबीयांचा जीव धोक्यात घालत आहेत. यासाठी प्रत्येकाने विचार करावा.- डाॅ. सुहास माने, जिल्हा शल्य चिकित्सक

ही पाहा उदाहरणे...nसध्या लग्नसराईमुळे जणू कोरोनाला निमंत्रणच मिळाले आहे. लग्नसमारंभात झालेल्या गर्दीमुळे सध्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यात तरुणाईचा हुल्लडबाजीपणा अंगलट येत आहे.nघरातील मंडळीशिवाय माझा दुसऱ्या कुणाशीही संपर्क आला नाही. घरातील मंडळी खूप कमी प्रमाणात घराबाहेर जातात. तरीही मी कोविड पॉझिटिव्ह आलो. गृहकामासाठी, काही साहित्य आणण्यासाठी घरातील मंडळी बाहेर जाणार नाही तर काय. परंतु खूप काळजी घेऊनही आम्ही पाॅझिटिव्ह आलो आहोत. आताही काळजी घेणे सुरूच असल्याचे एका आजोबांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस