शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
2
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
3
मोठी बातमी: उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी दिला पदाचा राजीनामा
4
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
5
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
6
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
7
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
8
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर
9
स्थानके चकाचक, डेपो मात्र घाण; एस.टी.च्या स्वच्छता अभियानात १४९ बसस्थानके नापास
10
धनखड यांचा राजीनामा, आता पद कोण सांभाळणार, नव्या उपराष्ट्रपतींची निवड कशी होणार? अशी आहे संपूर्ण प्रक्रिया
11
सूरज चव्हाण यांची अखेर हकालपट्टी; छावा कार्यकर्त्यांना मारहाण भोवली
12
हनी ट्रॅपप्रकरणी संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी; ‘त्या’ हॉटेल व्यावसायिकाचे जमीन व्यवहार तपासणार
13
मंत्री शिरसाट यांच्या घरात शिरला खतरनाक गुन्हेगार; सुपारी दिल्याचा संशय 
14
मुंबई उच्च न्यायालयाच्या वांद्र्यातील नव्या इमारतीसाठी जमीन ताब्यात!
15
शाळकरी मुलीच्या गळ्याला लावला चाकू; पंधरा मिनिटांच्या थरारानंतर मुलीची सुटका
16
शेतकऱ्याचा मुलगा ते उपराष्ट्रपती, अशी राहिली आहे जगदीप धनखड यांची वादळी कारकीर्द
17
संविधानाचे कलम ६७(अ) काय सांगते? ज्याअंतर्गत जगदीप धनखड यांनी दिला उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा
18
गोव्याहून इंदूरला येणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग, १४० जण करत होते प्रवास
19
सुनील तटकरे यांच्या सांगण्यावरूनच विजयकुमार घाडगे यांना मारहाण, मनोज जरांगे-पाटील यांचा आरोप
20
दातांवर उपचार करताना महिलेचे कानही झाले बरे, २० वर्षांपासून येत नव्हतं ऐकू, असा घडला चमत्कार

पाण्यासाठी टँकरभोवती गराडा, एक ते दोन हंड्यांच्या पाण्यावर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2019 01:54 IST

केंबुर्ली गावात भीषण पाणीटंचाई । एक ते दोन हंड्यांच्या पाण्यावर समाधान

सिकंदर अनवारे

दासगाव : महाड तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अशा गावांना महाड पंचायत समितीमार्फत टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे. सध्याच्या परिस्थितीत गावांना होणारा पाणीपुरवठा हा अपुरा पडत आहे. महाड तालुक्यातील महामार्गालगत असलेल्या केंबुर्ली गावाला भीषण पाणीटंचाईची झळ बसली आहे. गावाला टँकरने पाणीपुरवठा केला जात असून, गावात टँकर शिरताच महिलांचा त्याच्याभोवती पाण्यासाठी गराडा पडतो.

महाड तालुक्यातील केंबुर्ली गावात गेल्या दोन महिन्यांपासून भीषण पाणीटंचाई आहे. या गावात फक्त दोनच विहिरी असून, गावासाठी येणारी नळ पाणीपुरवठा योजनादेखील कधीच ठप्प झाली आहे. विहिरी कोरड्या पडल्या आहेत. सध्या येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. दिलासा म्हणून महाड पंचायत समितीकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अपुरा आहे. प्रत्येक व्यक्ती आपल्याला जास्त पाणी मिळावे याकरिता टँकर गावात येताच त्याच्यामागे धावपळ करताना दिसतो.गेल्या अनेक वर्षांपासून केंबुर्ली गावाला पाणीटंचाईच्या झळा बसत आहेत. सध्या टँकरने पाणीपुरवठा होत असला तरी तो अपुरा आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर कायमस्वरूपी तोडगा काढण्याची, या ठिकाणी जलसंधारणाची, सिंचनाची कामे होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने शासनाकडून प्रयत्न होणे अपेक्षित असल्याचे स्थानिक सांगतात.

टॅग्स :RaigadरायगडWaterपाणी