शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

ई-टोकनच्या माध्यमातून सवडीनुसार सीएनजी भरण्याची सुविधा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2018 00:39 IST

सध्या मुंबई व परिसरातील सीएनजी स्टेशनवर रिक्षा व टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग लावावी लागते.

मुंबई : सध्या मुंबई व परिसरातील सीएनजी स्टेशनवर रिक्षा व टॅक्सीमध्ये सीएनजी भरण्यासाठी मोठी रांग लावावी लागते. ही परिस्थिती बदलण्यासाठी सीएनजी स्टेशनवर रिक्षा व टॅक्सीचालकांनी जाण्यापूर्वी ई-टोकन पद्धतीचा वापर करण्यास प्रारंभ झाला आहे. त्यामुळे सीएनजी स्टेशनवरील रांग कमी होण्यास मदत मिळण्याची शक्यता आहे.सीएनजी भरण्यासाठी सध्या मोठी रांग लागत असल्याने रिक्षा व टॅक्सी चालकांना बहुमूल्य वेळ यासाठी गमवावा लागतो. नवीन पद्धतीनुसार अ‍ॅपच्या माध्यमातून वाहनचालकांनी आपले लोकेशन शेअर करून संबंधित सीएनजी स्टेशनवर सीएनजी भरण्यासाठी जाण्याची इच्छा व्यक्त करण्याची गरज आहे. त्यानंतर सीएनजी स्टेशनतर्फे संबंधित वाहनचालकांना संभाव्य वेळ दिली जाईल व त्याद्वारे आगाऊ वेळ नोंदवून त्यांना कधी यायचे हे कळवले जाईल. त्यामुळे वाहनचालक त्यांना दिलेल्या वेळी आल्यावर त्यांना रांग न लावता थेट सीएनजी भरण्यासाठी संधी दिली जाईल. सध्या ताडदेव, शीव व देवनार या तीन ठिकाणी सीएनजी स्टेशनवर प्रायोगिक तत्त्वावर ही योजना राबवली जात आहे. या प्रकल्पाला चांगला प्रतिसाद मिळाल्यास मुंबई, नवी मुंबई व ठाणे परिसरातील सर्व २२४ सीएनजी स्थानकांवर ही योजना राबविण्याचा मनोदय प्रशासनाने व्यक्त केला़