सेंद्रिय खतामुळे शेती उत्पादनात वाढ शक्य;कृषी विकासातील सीमोल्लंघनाचा विचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2017 05:23 AM2017-10-01T05:23:48+5:302017-10-01T05:23:56+5:30
हिरवा कचरा, भुईमुगाची टरफले, तांदळाचा तूस आदी कचºयापासून डिझेल निर्मितीचे पेटंट देशात सर्वप्रथम मिळविणारे रायगड जिल्ह्यातील गुळसुंदा येथील सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी, अलीकडेच सेंद्रिय शेतीस पोषक अशा कल्चरची निर्मिती केली आहे.
- जयंत धुळप ।
अलिबाग : हिरवा कचरा, भुईमुगाची टरफले, तांदळाचा तूस आदी कचºयापासून डिझेल निर्मितीचे पेटंट देशात सर्वप्रथम मिळविणारे रायगड जिल्ह्यातील गुळसुंदा येथील सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी, अलीकडेच सेंद्रिय शेतीस पोषक अशा कल्चरची निर्मिती केली आहे. सेंद्रीय शेतीतून अधिक उत्पादन प्राप्त होऊ शकते, हे सप्रयोग सिद्ध करून ‘स्वच्छ भारत अभियान’ आणि ‘देशातील सेंद्रिय शेती’ याची सांगड घातल्यास, शेती उत्पादनात व आर्थिकदृष्ट्या समृद्ध होऊ शकतो, असा विश्वास सेंद्रिय शेती संशोधक मीनेश गाडगीळ यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केला आणि विजयादशमीच्या दिवशी कृषी विकासातील सीमोल्लंघनाचा आधुनिक विचार मांडला.
सेंद्रिय शेती विषयी सध्या मोठ्या प्रमाणावर जागरूकता होत आहे; परंतु सेंद्रिय शेती म्हणजे नुसते शेण, लेंडी टाकून श्ोती न करता, काही नावीन्यपूर्ण गोष्टी मागवून सगळ्या प्रकारची न्यूट्रियन्ट (पोषक द्रव्ये) शेतीस मिळू शकतील, याचा विचार करणे गरज असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, गोवा आदी राज्यांत सेंद्रिय शेतीचे प्रयोग यशस्वी केले आहेत. त्यांनी संशोधन करून शोधून काढलेल्या सेंद्रिय खतांमध्ये देशी गाईचे शेण, देशीवाणाच्या बक ºयांची लेंडी, राख यांसारखे घटक वापरले आहेत. त्यातून पावडर प्रकारातील जमिनीत देण्याचे खत तयार करण्यात आले आहे.
सेंद्रिय खतांच्या नियमित वापराने पिकांवरील किडींचे प्रमाण कमी होते. जमिनीचा पोत सुधारतो. तसेच जमिनीची पाणी साठवून ठेवण्याची क्षमता वाढते. उत्पादनात वाढ होऊन उत्पादित मालाची गुणवत्ता देखील सुधारते. या सेंद्रिय खतांचा सर्व प्रकारची धान्ये उदा. भात, गहू, सोयाबिन, तूर, मूग, वाल, हरभरे, सर्व प्रकारच्या भाज्या व फळे यांवर अनेक ठिकाणी वापर चालू झालेला आहे व त्यातून दर्जेदार उत्पादनाबरोबरच उत्पादनवृद्धी होते, याचे स्पष्ट निष्कर्ष प्राप्त झाल्याचे गाडगीळ यांनी सांगितले. राष्ट्रीय हिताच्या उपक्रमात नागरिकांचा स्वेच्छा सहभाग आवश्यक त्याकरिता घरातील ओला व सुका कचरा वेगळा करून देण्याचे छोटेसे काम करून नागरिकांनी या राष्ट्रीय हिताच्या उपक्रमात स्वेच्छेने सहभाग देणे आवश्यक आहे. रासायनिक खतासाठी सरकारचे कोट्यवधी रुपयांचे दिले जाणार अनुदान वाचून, जमिनीचा ºहास थांबून सेंद्रिय आरोग्य संवर्धक उत्पादने देशवासीयांना उपलब्ध होतील, असा ठाम विश्वास त्यांनी अखेरीस व्यक्त केला.
मोफत खते उपलब्ध
शहरात व ग्रामीण भागात तयार होणाºया कचºयापासून सेंद्रिय खतनिर्मिती केली, तर पहिल्या भागात कचºयाचे व्यवस्थापन व दुसºया भागात सेंद्रिय खतांची निर्मिती होऊन शेतकºयांना सेंद्रिय खते मोफत उपलब्ध करून देता येऊ शेकतील, असा विश्वास गाडगीळ यांना आहे.