शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

फॅन्सी मास्क विकत घेण्याकडे ग्राहकांचा कल, मास्कच्या नियमाबाबत नागरिक जागरूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2020 00:13 IST

Raigad News : सरकारच्या निर्णयाची माहिती नागरिकांनाही असल्याने मेडीकल दुकानदार चढ्या दराने मास्कची विक्री करण्यास धजावत नाहीत मात्र अन्य दुकानामधून फॅन्सी मास्क विकत घेण्याचा ग्राहकांचा कल वाढल्याचे लाेकमतने केलेल्या रिअॅलिटी चेकमधून दिसून आले.

- आविष्कार देसाई रायगड : ‘काेराेनापासून वाचायचे असेल तर, ताेंडाला मास्क लावणे आणि सॅनिटीयझरचा वापर करणे बंधनकारक आहे. सुरुवातीला चढ्या दराने मिळणाऱ्या मास्कमुळे सर्वसामान्याना खरेदी करणे परडत नव्हते. आता सरकारच्या निर्णयाची माहिती नागरिकांनाही असल्याने मेडीकल दुकानदार चढ्या दराने मास्कची विक्री करण्यास धजावत नाहीत मात्र अन्य दुकानामधून फॅन्सी मास्क विकत घेण्याचा ग्राहकांचा कल वाढल्याचे लाेकमतने केलेल्या रिअॅलिटी चेकमधून दिसून आले. काेराेनाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना मास्क वापरण्याची सवय लागली आहे.  

बाजारामध्ये विविध फॅन्सी मास्कअलिबाग शहरातील मेडिकल दुकानामध्ये सरकारी निमयमांचे पालन केले जाते. सुरुवातीला अव्वाच्या सव्वा किमतली विकले जाणारे मास्क आता नियमानुसार मिळत आहेत. काेराेना कधी जाणार याबाबत अनिश्चितता आहे. त्यामुळे बाजारामध्ये विविध फॅन्सी मास्क विक्रीसाठी आले आहेत. ते खरेदी करण्याचा कल असल्याचे दिसून आले. 

मास्कचा नियमित वापरश्रीवर्धन तालुक्यात मास्कबाबत नागरिकांमध्ये चांगलीच जनजागृती झाली आहे. त्यामुळे नागरिक काेराेनापासून वाचवण्यासाठी मास्कचा वापर करताना दिसत आहे. या ठिकाणीही सरकारी नियमानुसारच मास्कची विक्री करण्यात येत आहे. जागरुक नागरिक संबंधीतांना सरकारी नियमांची आठवणही करुन देत आहेत. 

मास्क अन् कमालीची जागरूकता कर्जतमध्येही मास्कबाबत कमालीची जागरुकता आली आहे. मेडीकल दुकांनामधून मास्क खरेदी करताना नागरिकांना सरकारी किमतीची माहिती असल्याने ते थेट किमत सांगुन अमूक मास्क पाहीजे असे सांगत आहेत. त्या ठिकाणीही रंगबीरंगी, फॅन्सी मास्क वापरण्याकडे नागरिकांचा कल असल्याचे दिसले. 

नियम मोडल्यास कारवाईमास्कच्या सरकारी किंमतीबाबत सर्व मेडीकल दुकानदारांना माहिती दिली आहे. भरारी पथकामार्फत आम्ही त्यावर लक्ष ठेवत आहाेत मात्र अद्यापही आक्षेपार्ह्य काहीच आढळले नाही. जर नियमांचे उल्लंघन केल्यास त्याच्या विराेधात कायदेशीर कारवाई करण्यात येईल. - गिरीश हुकरे, सहायक आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, रायगड

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या