शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

रायगडमधील कुलाबा किल्ल्याची दुरवस्था होणार दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2020 01:15 IST

आॅनलाइन बैठकीत झाला निर्णय : भारतीय पुरातत्त्व विभाग उद्या करणार पाहणी

आविष्कार देसाई।

रायगड : ऐतिहासिक कुलाबा किल्ल्याची दुरवस्था दूर करण्याबाबत भारतीय पुरातत्त्व विभागाने सकारात्मकता दर्शविली आहे. २ आॅक्टोबर - महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी किल्ल्याची पाहणी करण्यात येणार आहे. त्यानंतर कामासंबंधीच्या निविदा काढून कामाला सुरुवात होणार आहे. सरकारच्या या धोरणामुळे इतिहासप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

याबाबतची आॅनलाइन बैठक रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या पुढाकाराने पार पडली. बैठकीला पालकमंत्री अदिती तटकरे, भारतीय पुरातत्त्व विभागाचे अधीक्षक (प्रभारी) राजेंद्र यादव, जिल्हाधिकारी निधी चौधरी आणि किल्ल्याच्या दुरवस्थेकडे लक्ष वेधणारे अलिबागमधील तरुण किशोर अनुभवने, यतिराज पाटील, आकाश राणे, वैभव भालकर, हृषीकेश चिंदरकर हेदेखील उपस्थित होते.

‘कुलाबा किल्ल्यासाठी तरुण मावळे सरसावले’ या मथळ्याखाली ‘लोकमत’ने २६ सप्टेंबर रोजी वृत्त प्रसिद्ध करून प्रशासन आणि सरकारचे लक्ष वेधले होते. या वृत्ताची दखल खासदार सुनील तटकरे यांनी घेत तातडीची बैठक बोलावली होती. बुधवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास आॅनलाइन बैठक सुरू झाली. त्या वेळी तक्रारदार तरुण मावळ्यांनी किल्ल्याच्या दुरवस्थेचा मुद्दा स्पष्ट केला. खासदार सुनील तटकरे यांनी याबाबत पाहणी गरजेचे असल्याचे सांगितले. त्यानंतर पालकमंत्री अदिती तटकरे यांनी भारतीय पुरातत्त्व विभागाचे राजेंद्र यादव यांना किल्ल्याच्या दुरवस्थेचा पाहणी दौरा करण्याच्या सूचना केल्या. त्यानुसार २ आॅक्टोबर - महात्मा गांधी जयंतीच्या दिवशी दुपारी ४ वाजता किल्ल्याची तुटलेली तटबंदी आणि ढासळलेल्या बुरुजांची पाहणी करण्याचे यादव यांनी मान्य केले. पाहणी झाल्यावर लवकरच प्रशासकीय पूर्तता करण्यात येईल असे बैठकीत ठरल्याचे तक्रारदार किशोर अनुभवने यांनी सांगितले.‘लोकमत’मध्ये प्रसिद्ध झालेल्या वृत्ताची घेतली दखलइतिहासातील शौर्याची साक्ष देणाऱ्या अलिबाग येथील कुलाबा किल्ल्याचे बुरूज आणि तटबंदी ढासळत आहे. तातडीने याची दुरुस्ती केली नाही, तर तटबंदी आणि बुरूज पूर्णत: नष्ट होणार आहेत. याबाबत तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी अलिबाग येथील तरुणांनी केंद्र सरकारकडे १९ सप्टेंबर रोजी केली होती. याबाबत ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते.कुलाबा किल्ला हा महाराष्ट्राची शान आहे. पुरातत्त्व वास्तू, गड-किल्ले यांचे जतन आणि संवर्धन होणे गरजेचे आहे. कुलाबा किल्ला भावी पिढीसाठी प्रेरणादायी राहावा. यासाठी त्याची दुरवस्था दूर करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. २ आॅक्टोबर रोजी दुपारी ४ वाजता किल्ल्याची पाहणी करण्यात येणार आहे. - खासदार सुनील तटकरे

टॅग्स :RaigadरायगडFortगड