शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगवाडीची विहीर बांधून पूर्ण

By admin | Updated: June 24, 2016 03:43 IST

तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीच्या आदिवासी ग्रामस्थांची पाणी डोक्यावर वाहून नेण्याची धडपड थांबली आहे. आदिवासी उपयोजनेच्या निधीमधून

कर्जत : तालुक्यातील ओलमण ग्रामपंचायतीमधील तेलंगवाडीच्या आदिवासी ग्रामस्थांची पाणी डोक्यावर वाहून नेण्याची धडपड थांबली आहे. आदिवासी उपयोजनेच्या निधीमधून तेलंगवाडीच्या ग्रामस्थ यांच्यासाठी असलेली जुनी विहीर तोडून तेथे नवीन विहीर बांधण्याचे काम आदिवासी उपयोजनेने पूर्ण केले आहे. तेलंगवाडीमधील महिलांच्या डोक्यावरील हंडे उतरविण्यासाठी नळपाणी योजना जिल्हा प्रशासनाने राबविण्याची गरज आहे.तेलंगवाडी ही आदिवासीवाडी एका टेकडीवर वसलेली आहे. वाडीमधील रहिवाशांंना पिण्याचे पाणी आणण्यासाठी टेकडी उतरून खाली पायथ्याशी असलेल्या विहिरीवर यावे लागते. ओलमण येथील ग्रामस्थ मालोजी पादिर आणि रामचंद्र पादिर यांनी ३० वर्षांपूर्वी आपल्या जमिनीमध्ये विहीर खोदण्यास परवानगी दिली होती. त्यावेळी तेथे बांधलेली विहीर मोडकळीस आली होती आणि लहान आकाराच्या या विहिरीचे संरक्षक कठडे तुटून गेले होते. त्याचप्रमाणे विहीर बांधल्यापासून गाळ काढण्यात आला नसल्याने विहिरीमध्ये पाण्याचा साठा असून देखील त्याचा काही फायदा होत नव्हता. कारण विहिरीतील पाणी पिण्यास अयोग्य असल्याचा अहवाल पाणीपुरवठा विभागाने दिल्याने उन्हाळ्यात या तेलंग वाडीमधील आदिवासी महिलांची पाण्यासाठी धावपळ सुरु असायची. यामुळे आदिवासी उपयोजनेमधून तेलंगवाडीच्या विहिरींची दुरु स्ती व्हावी यासाठी या प्रभागाचे जिल्हा परिषद सदस्य सुदाम पेमारे यांनी प्रयत्न केले होते. त्यांच्या प्रयत्नानंतर तेलंगवाडीसाठी नवीन विहीर मंजूर झाली. नव्याने जुन्या विहिरीच्या ठिकाणी मोठी विहीर बांधताना ती अधिक खोल करुन ३० फूट व्यास असलेली नवीन विहीर बांधण्यात आली असून विहिरीची खोली अधिक वाढविल्यामुळे आता तेलंगवाडीच्या आदिवासी लोकांची पाण्याची समस्या कायमची संपली आहे. पाण्याचा भरपूर साठा तेथे तयार झाला असून आता त्या वाडीमधील महिलांच्या डोक्यावरील हंडे हातात आणण्यासाठी नव्याने पावले उचलण्याची गरज आहे.