शहरं
Join us  
Trending Stories
1
नेते गेले बांधावर! वेदनांच्या महापुरावर आश्वासनांची फुंकर; कुणी हात जोडले, कुणी व्यथा मांडल्या
2
लडाखमध्ये Gen Z क्रांती, स्वतंत्र राज्यासाठी पेटून उठले; रस्त्यावर उतरली तरूणाई, मागण्या काय?
3
Swami Chaitanyananda Saraswati: वासनांध बाबा गरीब मुलींना हेरायचा, खोलीत बोलवून...; ५० मोबाईलचा तपास, ५ राज्यात धाडी  
4
लडाख हिंसाचारात चार जणांचा मृत्यू, ७० जण जखमी, कर्फ्यू लागू, इंटरनेटवर बंदी; भाजपचा काँग्रेसवर कट रचल्याचा आरोप
5
‘हिंडेनबर्ग’ने भारतीयांच्या स्वप्नांवरच घातला घाला; गौतम अदानींचं भागधारकांना पत्र, म्हणाले...
6
APMC निवडणूक घ्या, प्रशासक नियुक्ती रद्द; उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले
7
आजचे राशीभविष्य- २५ सप्टेंबर २०२५, प्रगतीच्या संधी चालून येतील, आर्थिक लाभ होईल
8
नवी मुंबईत ‘गाेल्डन मेट्रो’चे पुढचे पाऊल; डीपीआरचे पुनरावलोकन, ३० मिनिटांत गाठा विमानतळे
9
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
10
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
11
कुजबुज! आता पवार कुटुंब एकत्र दिसणार का?; ‘झालं गेलं गंगेला मिळू द्या, महाराष्ट्र हितासाठी...'
12
मंत्रिमंडळाऐवजी पायाभूत समितीला अंतिम अधिकार; फडणवीस सरकारनं हा निर्णय का घेतला?
13
मुंबईत दुहेरी हत्याकांड! २३ वर्षीय तरुणाने वडील, आजोबांची केली हत्या; काकांवरही केला चाकू हल्ला
14
विरोधात लिहिले की पत्रकारांचा छळ सुरू होतो; हायकाेर्टानं नोंदवलं महत्त्वपूर्ण निरीक्षण
15
"माझ्या बेडरुममध्ये ये, तुला परदेशात फिरायला घेऊन जातो"; स्वयंघोषित बाबानं केला १७ मुलींचा छळ
16
बोलघेवड्याचा बोलाचा भात...! रशिया-युक्रेन युद्धाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विधानानं नवं वळण?
17
मायबाप सरकार, फक्त कागदावर नको, बांधांवर या! निकष बाजूला सारून मदतीचा हात पुढे केला पाहिजे
18
विमानाच्या चाकातील 'त्याच्या' प्रवासाचा जीवघेणा थरार! हृदयाचा थरकाप उडवणारी एक कहाणी
19
मैदानावर क्रिकेट खेळा, खुन्नस कसली काढता?; राजकीय ‘आकां’ना आपण जाब विचारला पाहिजे
20
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान

सारळ-घोळ धरण पूर्ण करा, अनंत पाटील यांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2018 06:37 IST

रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागात प्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्यास

अलिबाग : रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यांत डिसेंबर महिन्याच्या सुरुवातीलाच पाणीटंचाईच्या झळा जाणवू लागतात. त्यामध्ये अलिबाग तालुक्यातील खारेपाट विभागाचा प्रामुख्याने समावेश आहे. यावर मात करण्यासाठी याच विभागातप्रस्तावित असलेले सारळ-घोळ धरण सरकारने लवकरात लवकर पूर्ण केल्यास, तब्बल ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. जिल्हा प्रशासनासह सरकारचेया मागणीकडे लक्ष वेधण्यासाठीसारळचे माजी सरपंच अनंतपाटील यांनी एक दिवसाचेलाक्षणिक उपोषण केले. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाºयांनादिले.अलिबाग हे रायगड जिल्ह्याच्या राजधानीचे शहर म्हणून ओळखले जाते. मुंबईपासून जवळ असणाºया अलिबाग तालुक्याचा अद्याप म्हणावा तसा विकास झालेला नाही. रस्ते, वीज, पाणी हे मूलभूत प्रश्न आजही तालुक्याच्या कानाकोपºयात उभे आहेत. जिल्ह्याच्या विकास आराखड्यामध्ये कोट्यवधी रुपयांची तरतूद केली जाते. केंद्र सरकारसह राज्य सराकारमार्फतही विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दरवर्षी खर्च केला जातो; परंतु तेथील प्रश्न अजूनही कमी होताना दिसत नाहीत. किंबहुना अधिक प्रश्न हे जैसे थे असेच आहेत. त्यामध्ये पाणीप्रश्नाचा प्रामुख्याने समावेश आहे.केंद्र सरकारने राष्ट्रीय पेयजल योजना, त्याचप्रमाणे स्थानिक पातळीवरील नळ पाणीपुरवठा योजना अशा विविध योजना आखल्या आहेत. त्यासाठीही सरकारने कोट्यवधी रुपये देऊ केलेले आहेत; परंतु पाणीप्रश्न अद्यापही सुटलेला नाही. डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासूनच पाणीप्रश्न आ वासून उभा राहतो. यावर तोडगा काढण्यासाठी सारळ-घोळ धरणाची संकल्पना सुमारे ३० वर्षांपूर्वी पुढे आली होती. मात्र, या धरणाला म्हणावे तसे मूर्त रूप देण्यास स्थानिक आमदार, खासदार आणि जिल्हा प्रशासनाला यश आलेले नाही.तालुक्यातील खारेपाट विभागामध्ये पाण्याचा प्रश्न आता हळूहळू पेटू लागला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा प्रस्तावित सारळ-घोळ धरणाची आठवण झाली आहे. हे धरण अस्तित्वात आल्यास सारळ, म्हात्रोळी, दत्तपाडा, फुफादेवीचा पाडा, सारळ आदिवासीवाडी, म्हात्रोळी आदिवासीवाडी, डावली रांजणखार, बागदांडे, रेवस, बेलपाडा, कावाडे, बोडणी, मिळकतखार, विर्तसारळ, कोप्रोली, मांडवा, धोकवडे यासह अन्य मिळून सुमारे ३५ गावांतील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमचा निकाली निघणार आहे.या धरणासाठी जास्तीत जास्त सरकारी जमिनीचाच वापर होणार असल्याने विरोधाचे कारणच राहत नाही.तसेच ग्रामस्थांना पिण्यासह शेतीसाठीही मुबलक पाणी मिळणार असल्याने या धरणाला कोणाचाच विरोध राहिलेला नाही आणि राहणारही नाही, असे उपोषणकर्ते अनंत पाटील यांनी सांगितले. धरणाच्या या प्रश्नाकडे प्रशासनासह सरकारचे लक्ष वेधता यावे, यासाठी एक दिवसीय उपोषण केल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.धरणासाठी निर्सगनिर्मित भौगोलिक रचनाच्सारळ-घोळ धरण बांधण्यासाठी दोन्ही बाजूंना मोठमोठे डोंगर आहेत. त्या दोन्ही डोंगरांच्या मध्ये भली मोठी भिंत म्हणजेच धरण उभारल्यास मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा धरणात होऊ शकतो. कारण अलिबाग तालुक्यामध्येही मोठ्या संख्येने पाऊस पडतो.च्मात्र, कोणतीही उपाययोजना नसल्याने ते पावसाचे पाणी डोंगर-दºयातून समुद्राला जाऊन मिळते. तेच पाणी अडवल्यास सुमारे ३५ गावांची तहान भागवता येणार आहे. त्यामुळे प्रशासन, सरकार आणि लोकप्रतिनिधी यांनी याकडे गांभीर्याने पाहणे गरजेचे आहे.

टॅग्स :Raigadरायगड