शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

महिनाभरात सेफ्टी आॅडिट पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2018 01:40 IST

रोहा औद्योगिक वसाहतीत असणाºया सर्व म्हणजे ४४ उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी आॅडिट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे सक्त आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण

अलिबाग : रोहा औद्योगिक वसाहतीत असणाºया सर्व म्हणजे ४४ उद्योगांचे अग्निसुरक्षेसह सर्व प्रकारचे सेफ्टी आॅडिट येत्या महिनाभरात पूर्ण करा, असे सक्त आदेश राज्याचे बंदरे, वैद्यकीय शिक्षण, अन्न नागरी पुरवठा मंत्री तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी मंगळवारी रोहा येथे दिले.रोहा येथील अँथिया डीआरटी एरोमॅटिक प्रा. लि. कंपनीला सोमवारी लागलेली भीषण आग आणि त्यानंतर झालेल्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री चव्हाण यांनी मंगळवारी सकाळी रोहा येथील विश्रामगृहावर सर्व संबंधित विभागाच्या अधिकाºयांची बैठक बोलावली होती. पालकमंत्री चव्हाण सोमवारी रात्रीच तत्काळ घटनास्थळी दाखल झाले होते. त्यांनी आजूबाजूच्या गावात वायुप्रदूषणामुळे समस्या निर्माण होऊ नये, यासाठी मदत व बचाव कार्याचे नियमन केले. मंगळवारी सकाळी त्यांनी घटनास्थळाला भेट देऊन पाहणी केली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी त्यांच्यासमवेत उपस्थित होते. सोमवारच्या घटनेनंतर परिसरातील गावकºयांपर्यंत सुरक्षा संदेश वेळीच पोहोचवून त्याबाबत उपाययोजना करण्यात आलेली दिरंगाई व अशाप्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी करावयाच्या उपाययोजना याबाबत विचारविनिमय करण्यात आला.आगीच्या या घटनेचे सत्यशोधन करण्यासाठी महसूल, औद्योगिक सुरक्षा, अग्निशमन विभाग, प्रदूषण नियंत्रण मंडळ, पोलीस विभागाच्या अधिकाºयांचे संयुक्त पथक या घटनास्थळाची येत्या २४ तासांत तपासणी करून सत्यशोधन अहवाल जिल्हाधिकाºयांकडे सादर करेल. ही तपासणी पूर्ण होईपर्यंत घटनास्थळ सिल केले जाईल. कंपनी व्यवस्थापनाला त्यात हस्तक्षेप करता येणार नाही, असे निर्देश या वेळी पालकमंत्री चव्हाण यांनी दिले.रोहा औद्योगिक वसाहतीतील प्रत्येक उद्योग घटकाने स्वतंत्र सुरक्षा अधिकारी नेमावा, प्रत्येक कंपनी समोर फायर हायड्रन्ट बसविण्यात येऊन ते कार्यान्वित करावे, त्याची नियमित चाचणी घेऊन त्याची सर्व जबाबदारी संबंधित कंपनी व्यवस्थापनास द्यावी, रोहा आणि परिसरातील औद्योगिक वसाहतीतील उद्योगांकडून प्रदूषण नियंत्रणाच्या निकषांचे पालन होते आहे किंवा नाही, याची नियमित तपासणी होण्यासाठी सहा प्रदूषण नियंत्रण निरीक्षक नेमण्याबाबत महिनाभरात कारवाई करून रोहा येथील बंद झालेले प्रदूषण नियंत्रण मंडळाचे कार्यालय पुन्हा कार्यान्वित करावे, नेमलेल्या निरीक्षकांचे वेतन रोहा औद्योगिक संघटनेच्या निधीतून अदा करावे, असे आदेश दिले आहेत.या बैठकीस जि.प.अध्यक्ष अदिती तटकरे, आ. अवधूत तटकरे, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, मुंबई एमआयडीसीचे अग्निशमन अधिकारी मिलिंद ओगले, औद्योगिक सुरक्षा व आरोग्य संचालनालयाचे सह संचालक एस.पी. राठोड, उपसंचालक विक्र म काटमवार, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे बी. आर. वाघमारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अजित गवळी, स्थानिक प्रांताधिकारी, तहसीलदार, स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते.