शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवार योजनेची कामे तातडीने पूर्ण करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 03:53 IST

जलयुक्त शिवार योजनेची कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश महाड आमदार भरत गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.

बिरवाडी : जलयुक्त शिवार योजनेची कामे तातडीने पूर्ण करा, असे आदेश महाड आमदार भरत गोगावले यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत.महाडचे प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांच्या कार्यालयात महाड पोलादपूरमधील महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या कामाचा आढावा घेण्याकरिता शनिवारी दुपारी बैठक बोलविण्यात आली होती.बैठकीप्रसंगी महाड पंचायत समितीचे सभापती सीताराम कदम, पोलादपूर पंचायत समितीच्या सभापती दीपिका दरेकर, उपसभापती शैलेश सलागरे, पंचायत समिती सदस्य यशवंत कासार, राजिपचे माजी विरोधी पक्षनेते सुरेश कालगुडे, महाड-पोलादपूरमधील तहसीलदार, कृषी तालुका अधिकारी, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी, पाणीपुरवठा विभाग अधिकारी, लघुपाटबंधारे विभागाचे अधिकारी, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अधिकारी उपस्थित होते.गोगावले यांनी, महाराष्ट्र शासनाच्या जलयुक्त शिवार योजनेच्या अंमलबजावणीचा आढावा अधिकारी वर्गाकडून जाणून घेत, ज्या गावांमध्ये या योजनेंतर्गत कामे सुरू करण्यात आली आहेत, ती तातडीने पूर्ण करावी, असे आदेश दिले. पाणीटंचाई निवारण कामांमध्ये हयगय करणाºया अधिकाºयांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असेही या वेळी सांगण्यात आले. प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार यांनी बैठकीमध्ये योजनेचे सचिव तालुका कृषी अधिकारी असल्याने संबंधित खात्याच्या सर्व अधिकाºयांनी कामाबाबतचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. महाड-पोलादपूरमधील पाणीटंचाई निवारण कामकाजाबाबत जिल्हाधिकारी रायगड यांच्या आदेशाप्रमाणे कारवाई सुरू असल्याची माहिती त्यांनी बैठकीत दिली. पोलादपूरमधील १३ गावांचा समावेश जलयुक्त शिवार योजनेमध्ये करण्यात आला आहे. तर महाड तालुक्यातील १८ गावे जलयुक्त शिवार योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत. यामध्ये टँकरग्रस्त गावांना प्राधान्य देण्यात आले आहे. शासनाच्या जाचक अटी-शर्तींमुळे टंचाईग्रस्त गावांना पाणीपुरवठा करताना अडथळा निर्माण होणार नाही, याची खबरदारी अधिकाºयांनी घ्यावी, अशा सूचना गोगावले यांनी दिल्या. नदीवरील सिमेंट बंधारे, विहिरी, तलाव यांच्या माध्यमातून पाणीटंचाई निवारण करण्यात येत असल्याची माहिती या बैठकीत देण्यात आली.

टॅग्स :Raigadरायगड