शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

भ्रष्टाचाराविरोधात राज्यपालांकडे तक्रार; ग्रामपंचायत फंडातून मनमानी खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 05:34 IST

तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे.

अलिबाग : तालुक्यातील रामराज ग्रामपंचायतीमध्ये विविध विकासकामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तक्रारी केल्या होत्या. याबाबत पाठपुरावाही करण्यात आला होता. मात्र, त्यावर अपेक्षित कारवाई न झाल्याने संतप्त ग्रामस्थांनी थेट या प्रकरणाची तक्रार महाराष्ट्राच्या राज्यपालांकडे केली आहे. ग्रामस्थांनी नुकत्याच झालेल्या ग्रामसभेमध्ये हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे सत्ताधाऱ्यांसह प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.अलिबागपासून काही किलोमीटर अंतरावर रामराज ग्रामपंचायत आहेत. या गावात विकासकामे करताना ग्रामस्थांना विश्वासात घेतले जात नसल्याची तक्रार ग्रामस्थांनी ग्रामसभेत बोलून दाखवली आहे. १५ आॅगस्ट २०१८ रोजी तहकूब झालेली ग्रामसभा २८ आॅगस्ट २०१८ रोजी दुपारी ११ वाजता बोलण्यात आली होती. या ग्रामसभेमध्ये मागील सभेचे इतिवृत्त वाचून दाखवण्यात आले नाही. ग्रामस्थांनी १४ व्या वित्त आयोगाबाबत माहिती मागितली असता सरपंच आणि ग्रामसेवकांनी उडवाउडवीची उत्तरे देऊन माहिती देण्यास नकार दिल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.मागील तीन वर्षांतील १४ व्या वित्त आयोगाचा फंड, ग्रामपंचायत फंड खर्च करताना कोणत्याही प्रकारची निविदा न काढताच परस्पर सरपंच हे मनमानी पद्धतीने खर्च करतात. याबाबत विचारणा करण्यात आली असता, खर्चाचा ताळमेळ सांगण्यासही दुर्लक्ष करण्यात येते.ग्रामपंचायतींसाठी आवश्यक असणाºया वस्तूंची खरेदीही सरपंच आणि ग्रामसेवक स्वत:च्या मर्जीने करतात. त्यामुळे विकासकामांचा बट्ट्याबोळ झाला आहे. ग्रामपंचायतीमार्फत गोळा करण्यात येणारा कर अन्य मार्गाने मिळणारे उत्पन्न त्याबाबतचा जमाखर्च ग्रामसभेत दाखवण्यातही ग्रामसेवक असमर्थ ठरले असल्याचे निवेदनात म्हटले आहे. काही घरकुलांवर दोन वेळा बिले काढण्यात आली तर काही घरकूल उभारण्यातच आली नसल्याचे सभेत उघड करण्यात आले.गुरचरण जागेमध्ये बांधकामांना परवानग्या देतानाही गैरप्रकार झाल्याची शक्यता ग्रामस्थांनी बोलून दाखवली.ग्रामपंचायतीच्या मनमानी कारभाराबाबत तालुकास्तरापासून जिल्हास्तरावर तक्रारी करण्यात आल्या आहेत. मात्र, त्यावर अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नाही.- रामराज ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराची सीबीआय, सीआयडी चौकशीची मागणी करण्यात आल्याचे ग्रामस्थ संदेश पालकर यांनी सांगितले. सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आल्याने हा विषय ते ग्रामसभेच्या इतिवृत्तात नमूद करणार नाहीत. त्यामुळे चौकशी झालीच पाहिजे, असेही त्यांनी स्पष्ट केले.रामराज ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झालेला नाही. रीतसर कामे करण्यात येत आहेत. सर्वांना विश्वासात घेऊनच कामे केली जात आहेत.- अर्चना पालकर, सरपंच, रामराज ग्रामपंचायत

टॅग्स :Raigadरायगड