शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

डीवायएसपी विरोधात आयोगाकडे तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2018 04:58 IST

मानवी हक्क आयोग : ३ मे रोजी सुनावणी

बिरवाडी : महाड उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांच्या विरोधात मानवी हक्क आयोगाकडे दाखल तक्रारीवर ३ मे २०१८ रोजी मुंबईत मानवी हक्क आयोगासमोर सुनावणी होणार असून, या सुनावणीकरिता हजर राहण्याचे आदेश आयोगाचे प्रभारी अध्यक्ष भगवंतराव डी. मोरे यांनी दिले आहेत.महाड तालुक्यातील बिरवाडी कुंभारवाडा येथील महिला प्रभाती नभगण स्वाई यांनी महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांच्याविरोधात महाराष्ट्र राज्य मानवी हक्क आयोग यांच्याकडे ही लेखी तक्रार केली होती. या तक्रारीमध्ये, चीटफंड घोटाळ्यातील ठेवीदारांना न्याय मिळवून देण्याकरिता २२ आॅगस्ट २०१६ रोजी महाड शहरातून कंपनीविरोधात मोर्चा काढून कारवाई करण्यासंदर्भातील निवेदन सादर केले. या निवेदनावर काय कारवाई केली, या संदर्भातील अहवालासाठी २५ दिवसांनंतर उपविभागीय पोलीस अधिकारी सोनावणे यांच्या कार्यालयात भेटीकरिता पाच तासांची प्रतीक्षा, त्यानंतर समाधानकारक उत्तर न देता, गैरशब्दांचा वापर या कारणास्तव सोनावणेंविरोधात स्वाई यांनी २८ सप्टेंबर २०१६ रोजी उपोषण केले. त्याची दखल माध्यमांनी घेतल्याने सोनावणे यांच्या अंतर्गत चौकशीचे आश्वासन दिले. या सर्व घटनांचा राग धरून ३० डिसेंबर २०१६ रोजी सरकारी कामकाजात अडथळा आणल्या प्रकरणी गुन्हा दाखल केला. या प्रकरणी आयोगाने चौकशी करून आपल्याला न्याय द्यावा, अशी मागणी स्वाई यांनी केली होती.महाडच्या उपविभागीय पोलीस अधिकारी प्रांजली सोनावणे यांच्या कार्यकाळामध्ये कार्यालयाला टाळे लावण्याची घटना घडली होती. अपमानास्पद वागणूक देणे, या कारणावरून महिलांचे उपोषण झले होते. दरम्यान, या संदर्भात सोनावणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता, त्या उपलब्ध होऊ शकल्या नाहीत.

टॅग्स :Policeपोलिस