शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 20, 2020 23:30 IST

सिझनल अ‍ॅलर्जीचे प्रमाण वाढले : दुर्लक्ष न करण्याचा डॉक्टरांचा सल्ला

निखिल म्हात्रे।लोकमत न्यूज नेटवर्कअलिबाग : ऋतू बदलल्याने जिल्ह्यात सर्दी-खोकला व घशाच्या संसर्गाने डोके वर काढले आहे. विशेषत: लहान मुले यामुळे त्रस्त आहेत. सर्दी-खोकल्याकडे फारसे गांभीर्याने पाहिले जात नसले, तरी दुर्लक्ष करणे अनेक वेळा घातक ठरू शकते. सर्दी, खोकला, कणकण, घसा खवखवणे या ‘सिझनल अ‍ॅलर्जी’ना वैद्यकीय भाषेत ‘हायनायिटज’ म्हणतात. या आजाराच्या रुग्णांत मागील काही दिवसांत वाढ झाली आहे.

नाक, फुप्फुस, घसा आणि कान यांचा परस्परसंबंध असल्यामुळे सर्दी-खोकला ही एखाद्या भयंकर आजाराची चाहूल असू शकते. यामुळे वैद्यकीय सल्ला घेणो आवश्यक असल्याचे मत बालरोगतज्ज्ञ डॉ.सागर खेदु यांचे आहे. ते म्हणाले, गेल्या काही दिवसांत पवासाला सुरुवात झाल्यानंतर या आजाराची लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या वाढली आहे. जेव्हा ऋतू बदलतो, त्यावेळी खोकला येणे, नाकातून पाणी यणे, सर्दी, डोके दुखणे, अंग दुखणे आदी त्रास डोकं वर काढतात. लहान मुले, वृद्ध व्यक्तींमध्ये प्रतिकारशक्ती चांगली नसल्याने याचा जास्त त्रास होतो. ब्राँकायटिससारखे फुप्फुस आणि श्वसननलिकेचे आजारही जडतात. अशा वेळी बाहेरचे खाणे टाळावे. जास्तीतजास्त गरम पाणी प्यावे. खोकताना, शिंकताना नाका-तोंडावर हात ठेवावा, प्रवास करीत असताना मास्क, रुमाल व स्कार्पचा वापर करावा, याबरोबरच दररोज व्यायाम करावा असे सांगितले.

घसातज्ज्ञ डॉ.अंकुश शिंदे यांनी गर्दीच्या ठिकाणी, बसमध्ये कोणी शिंकला, खोकला तर त्याचाही संसर्ग होऊ शकतो. जंतुसंसर्ग होण्याचं दुसरं महत्त्वाचं कारण आहे, हवेचं प्रदूषण, पावसाळ्यात रस्त्यावरील सतत उडणारी धूळ, बांधकामांमधील वाळू, पीओपी या वस्तूंची ज्यांना अ‍ॅलर्जी असते, त्यांच्या घसा आणि नाकावर परिणाम होतो असे सांगितले.

दररोजचे १० ते १५ रु ग्णच्गेल्या काही दिवसांपासून सकाळी वाढणारे तापमान तर काही वेळानंतर पडलेल्या पावसामुळे वातावरणात अचानक बदल झाल्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. सर्दी, खोकला, डोकेदुखी असलेले १० ते १५ रुग्ण रोज दवाखान्यात उपचारासाठी येते आहेत, असे डॉ.राजीव तंबाळे यांनी सांगितले.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस